दिनांक 16 January 2019 वेळ 4:25 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अंगणवाडी सेविकांच्या नियमबाह्य नेमणुका सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र वेहळेंची चौकशीची मागणी

अंगणवाडी सेविकांच्या नियमबाह्य नेमणुका सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र वेहळेंची चौकशीची मागणी

LOGO 4 Onlineप्रतिनिधी : 

कुडूस, दि. 02 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वाडा कार्यालयामार्फत सन 2015 मध्ये वाडा तालुक्यातील काही गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या नियमबाह्य झाल्या असून त्याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र वेहळे यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात भालचंद्र वेहळे म्हणतात, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वाडा कार्यालयामार्फत सन 2015 मध्ये वाडा तालुक्यातील काही गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या करताना शासनाच्या नियमाप्रमाणे अंगणवाडी सेविका भरतीची वयोमर्यादा 30 वर्षे आहे. मात्र काही अंगणवाडी सेविकांचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक असताना देखील अशा अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे निवदनात नमुद करण्यात आले आहे. ही बाब वेहळे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत उघड झाली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी वेहळे यांनी पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top