दिनांक 16 January 2019 वेळ 4:06 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू: घुसखोर बांगलादेशी नागरिकाला २ वर्षाची शिक्षा

डहाणू: घुसखोर बांगलादेशी नागरिकाला २ वर्षाची शिक्षा

Rajtantra_EPAPER_020418_1_080407राजतंत्र न्यु नेटवर्क
डहाणू, दि. ०१: अधिकृत पासपोर्ट व व्हिसा नसताना भारतात घुसखोरी करून डहाणू तालुक्यातील रानशेत (महालक्षमी गड ) येथे वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. बाबू रज्जाक मंडळ (वय ५२) असे सादर इसमाचे नाव असून तो मागील २२ वर्षांपासून येथे
रहात आहे.
मूळ बांगलादेशमधील मागुता जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बाबू मंडळ याने २२ व वर्षांपूर्वी बी इन पासपोर्ट भारतात प्रवेश केला होता. बाबू हा गरिबीला कंटाळून बांगलादेश सोडून पश्चिम बंगाल मार्गे भारतात आला होता. तेथून तोआला महालक्षमी गडावरील मंदिराच्या बांधकामासाठी गडावरील मंदिराच्या बांधकामासाठी मजुरीकाम करणाऱ्या कंत्राटदारासोबत आला आणि पुढे त्याचे मन येथेच रमले. तो कायमचा या मंदिरात स्थायिक झाला व देवीचा सेवेकरी बनला. मंदिराची झाडलोट करणे, भाविकांना सोयीसुविधा पुरवणे हि कामे तो नित्य नियमाने करीत असे. भाविकांची जेवण्याची व्यवस्था करीत असे. त्याचे वर्तन कधीही सस्यस्पद नव्हते. बांगलादेशाची ओळख कधीही त्याने लपवली नव्हती. त्याच्या प्रामाणिकपणामुळे व सेवाभावी वृत्तीमुळे तो सगळ्यांच्या गळ्यातील टेट बनला होता. यादरम्यान त्याने अवैध्यरित्या पासपोर्ट, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, बँक पासबुक व पेनकार्ड देखील बनवून घेतले.

२२ वर्षांपासून डहाणूत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या मंडळ याने सण २००२ साली काढलेल्या पासपोर्टची मुदत सण २०१२ साली संपल्यामुळे त्याने पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. या अर्जाची चोईकाशी डहाणू पोलीस स्टेशनला आल्यानंतर गोपनीय विभागाचे पोलीस नाईक गोसावी यांनी चोईकाशी केली असतायेथे त्यांच्या नावातील वडिलांचे नाव सपक असल्यावरून शंका आली. बाबूने मात्र सरळ सरळ काहीही लपवाछपवी न करता आपण मुलाचे बांगलादेशी असल्याचे सांगून २२ वर्षांपासून येथे वास्तव्यास असल्याचे सांगितले. पोलिसांनांदेखील त्याच्यावर कारवाई न करण्यावाचून पर्याय राहिला नाही व तज्ञाच्या विरोधात २५ सप्टेंबर २०१३ रोजी डहाणू पोलिसस्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलाम ४२०, ४६६, ४६८, ४७१, ४७४ सह परकीय नागरिक कायदा कलम १९४६ चे कलम १४ (अ), पारपत्र कायदा १९६७ चे कलाम १२ (१) (अ), पारपत्र कायदा १९२० चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक आर. जे. माने यांनी या प्रकरणी तपस करीत मंडळ विरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या पुराव्याने ग्राह्य धरत न्यायालयाने शनिवारी (दि. ३१) बाबू मंडळला २ वर्षे कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top