दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा :ह. वि. पाटील विद्यालयातील विद्यार्थिनींना सॅनिटरी न्यापकिनांचे वाटप

वाडा :ह. वि. पाटील विद्यालयातील विद्यार्थिनींना सॅनिटरी न्यापकिनांचे वाटप

Rajtantra_EPAPER_020418_4_090449प्रतिनिधी
          कुडूस, दि. ०१ रोटरी क्लब ऑफ मुंबई अंतर्गत रायझिंग स्टार ग्रुप व स्वाभिमान संघटना यांच्या वतीने चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयातील किशोर वयीन मुलींना सॅनिटरी नेपकिनांचे वाटप करण्यात आले.
शंकरराव हरी पाटील सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत भोईर मुलींना समुपदेशन करताना म्हणाले कि, मुलींच्या समस्या वेगळ्या असतात. मुली प्रत्यक्ष त्यावर बोलू शकत नाही. त्यांच्या वयानुसार काही विशिष्ट्य प्रश्न निर्माण होतात. त्या टप्यावर त्यांना आवश्यक ती माहिती मिळणे गरजेचे असते. अस्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी व स्वाभिमान संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे, असे भोईर म्हणाले, तर पालघर जिल्हा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष जितेश पाटील यांनी मुलींनी संकोचत शासकीय सेवा व क्रीडा क्ष्रेत्रात भरारी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. yaveli ६०० मुलींना नेपकिनांचे वाटप करण्यात आले.
स्वाभिमान संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे, रोटरी क्लब अध्यक्ष सौरभ तुलशान, आरोग्य सेविका शोभा भोईर, अंगणवाडी कार्यकर्ती सुलभ भोईर, ग्रामसेविका उज्वला जाधव, रोटरीच्या रुची गुप्ता, कनिष्क मॅडम, आकांक्षा अग्रवाल, यशवर्धन अग्रवाल आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सूत्र संचालन भक्ती पाटील यांनी तर संदेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top