दिनांक 16 January 2019 वेळ 3:16 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बी.एड.विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न. 

बी.एड.विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न. 

Rajtantra_EPAPER_020418_4_090400प्रतिनिधी:
कुडूस दि. ०१: येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लक्ष्मी रतनशहा बी.एड. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
             या पदवीदान समारंभातुन पदवीधारक बी.एड.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शर्मा यांनी प्रारंभीच सांगितले की, कुठलेही काम करतांना करीत असलेल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे.या संस्थेच्या संस्थापकांनी निष्ठेने काम केले म्हणूनच ही संस्था भक्कम पायावर उभी आहे. या बाबत समाधान व्यक्त करून संस्थेचे कुठलेही काम असो, मी त्यासाठी हवे योगदान देण्यास तयार आहे. असे आश्वासन शर्मा यांनी दिले. विद्यार्थ्यांनी केवळ डिग्री घेवून नोकरीवर समाधान न मानता समाज, गाव, कुटूंबासाठी योगदान देवून त्यांचा विकास केला पाहिजे. ध्येय ठेवून वाटचाल केलीत तर मागे वळून पाहण्याची गरजच लागणार नाही. अशा शब्दांत शर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.
             संस्थाचालक मुस्तफा मेमन यांनी शर्मा यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील डी प्लस झोन, वीज वितरण व्यवस्था, महाविद्यालय आदि विकास कामे झाली आहेत. सामाजिक कामाची त्यांना आवड आहे. अशा शब्दांत शर्मांचा गौरव केला. पुढे बोलतांना त्यांनी पदवी धारकांना सांगितले की,  बी. एड. विद्यार्थ्यांनी सामाजिक कामाचा वसा घेवून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. व संस्काराची जपवणूक केली पाहिजे. तरच आपल्या पदवीचा सदुपयोग झाला म्हणता येईल. असे सूचक उदबोधन मेमन यांनी केले.
            यावेळी बी एड पदवीधारक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातून शिक्षक व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, अशोक पाटील, रफीक मेमन, महाविद्यालयाचे प्राचार्य शुक्लासर, शिक्षक उपस्थित होते

comments

About Rajtantra

Scroll To Top