दिनांक 16 January 2019 वेळ 3:34 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्वातंत्र्य चळवळीतील  योगदान मोलाचे – विष्णू सवरा 

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्वातंत्र्य चळवळीतील  योगदान मोलाचे – विष्णू सवरा 


प्रतिनिधी Rajtantra_EPAPER_020418_1_090412

 वाडा, दि. ०१: स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लंडन येथे इंडिया  हाऊसची स्थापना करून भारतीय तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंडिया हाऊसचे दरवाजे कायम उघडे करून देत  त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य करणाऱ्या क्रांतिकारक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान अतिशय मोलाचे असून त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे मत  राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथे केले. येथील हिंगलाज माता मंदिर ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी ( दि.३०)  आयोजित केलेल्या पंडित  वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी  ते बोलत होते.
              पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे ब्रिटिश सत्तेविरोधातील  स्वातंत्र्य लढ्यातील  असंख्य क्रांतीकारकांचे व स्वातंत्र्य सेनानींचे प्रेरणास्थान होते. त्यामुळे पंडितजींचे कार्य हे अविस्मरणीय व प्रेरणादायी असल्याचे मंगलदास भानुशाली यांनी सांगितले. स्वातंत्र्य काळात एवढे मौलिक कार्य असून देखिल पंडीतजींचा परिचय इतिहासात अत्यल्प असल्याची खंतही त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केली. तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ना. के. फडके यांनी आपल्या भाषणात पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जीवनातील अनेक छोटे मोठे प्रसंग कथन केले.
             या कार्यक्रमाप्रसंगी पालघरचे  पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील, इस्कॉनचे  सनथकुमार प्रभुजी, पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजीव जोशी, भाजप तालुकाध्यक्ष संदिप पवार, शिवसेना तालुका प्रमुख उमेश पटारे, विक्रमगड तालुका प्रमुख सागर आळशी, बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष अनंता भोईर, मनसे तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, वाडा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, हिंगलाज माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष निखिल भानुशाली, उपाध्यक्ष भानुदास भानुशाली आदी प्रमुख अतिथींसह नगरसेवक मनिष देहेरकर, रामचंद्र जाधव, नगरसेविका जागृती काळण, पुंडलिक भानुशाली,  आदी मान्यवर उपस्थित होते

comments

About Rajtantra

Scroll To Top