दिनांक 22 September 2019 वेळ 4:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार मध्ये  अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी  शिबीर संपन्न

जव्हार मध्ये  अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी  शिबीर संपन्न

Rajtantra_EPAPER_020418_4_080408प्रतिनिधी
जवाहर दि. ०१: शहरात ग्राममैञीण महिला महासंघ व जायंटस वेलफेअर फाउंडेशन रिसायकल लाईफ यांच्या वतीने अवयव दान जाणीव जागृती शिबीर दि. १ एप्रिल २०१८  रोजी जव्हार शहरातील “उत्तमशेठ रजपूत बहुउद्देशिय सभागृह”  येथे पार पडले .या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक डाँ. कमल .जे.जैन , डॉ .सुधाकर पाटील  व जीवराज नगरिया यांनी अवयव दान नेमके कोण करू शकतो व कोणत्या प्रकारचे अवयव दान करू शकतो व नागरिकांचे प्रश्ऩ समजून त्याचे निराकरण केले व अवयवदान नोंदणी कशी करावी .या विषयी मार्गदर्शन केले.
            शरीर  हे क्षणभंगूर  आहे ,  मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर  ‘ अवयव दान ‘  करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या  आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो.  तर ३५लोकांच्या  आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो.  मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती  नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे  १० विविध अवयव आपण दान करू शकतो.
         ‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. मरणोत्तर मानवी  अवयवाची एक तर राख होते किंवा माती! मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही. ‘प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. मृत्यूनंतर प्रेत जाळण्यासाठी लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होते, त्यापेक्षा अवयवदान केल्यास समाजालाही त्याचा उपयोग होतो.या सारखी जाणीव उपस्थित मार्गदर्शक यांनी करून दिली . या सारखा अवयवदान जाणीव व नोंदणी चा कार्यक्रम जव्हार शहरात प्रथम राबविण्यात आला सदर शिबीराला जव्हार तालुक्यातील सर्व महिला , नागरिक उत्तम प्रतिसाद दिला व अवयव दान नोंदणी केली . या शिबिरासाठी ग्राममैञीण महिला महासंघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ .प्रज्ञा कुलकर्णी व सचिव कामिनी हर्षद मेघपुरिया व तसेच डॉ . प्रतिभा विठठ्ल सदगीर यांनी परिश्रम घेतले .

comments

About Rajtantra

Scroll To Top