दिनांक 17 February 2020 वेळ 11:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » काकूची हत्या : पुतण्याला जन्मठेप

काकूची हत्या : पुतण्याला जन्मठेप

LOGO 4 Onlineकासा, दि. ३०: बोरिंगचे पाणी भारण्यरून झालेल्या वादातून काकूंची हत्या करणाऱ्या आरोपी पुतण्याला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावले आहे. देऊ राज्या हाडळ असे आरोपीचे नाव असुंन ६ वर्षांपूर्वी मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून त्याने काकु मालही हाडळ हिची केली होती.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासातील चिंचले हाडळपाडा येथे राहणारी ५५ वर्षीय मालही पांगला हाडळ ही महिला २६ नोव्हेंबर २०१२ रोजी गावातील सार्वजनिक बोरिंगवर पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा पुतण्या देऊ हाडाळणे तिला पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा पुतण्या देऊ हाडळने तिला पाणी भरण्यास विरोध केल्याने त्यांच्यात बाचाबाची होऊन संतापलेल्या देऊ याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर घाव घातले होते. यात गंभीर जखमी झालेल्या मालही हाडळ यांचा मृत्यू झाला होता. कासा पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांनी याप्रकरणी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप सादर केले होते. आज झालेल्या सुनावणीत आरोपी देऊ विरोधातील पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top