दिनांक 18 June 2018 वेळ 10:59 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » नाणे सांगे गावात रंगली कुस्तीची दंगल

नाणे सांगे गावात रंगली कुस्तीची दंगल

Rajtantra_EPAPER_310318_1_090344प्रतिनिधी
            मनोर, ता.30 वाडा तालुक्यातील नाणे गावात आंबिस्त्याचे जेष्ठ कुस्तीपटू पद्माकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुवा ग्रुपच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धा गुरुवार(ता.29) आयोजित करण्यात आल्या होत्या.
           सकाळी सात वाजता  सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाल्यानंतर प्रथम महिला कुस्ती सामने झाले. त्यात अंतिम सामना जिल्हास्तरावर कुस्ती खेळलेल्या दीक्षिता पाटीलने बाजी मारली. पुरुष गटात मुंबईच्या शैलेश मुसळे आणि भिवंडीच्या शत्रू भोईर यांच्यातील सामना शत्रू भोईरने जिंकला.मुंबई चा प्रवेश यादव व कल्याणचा पंकज कराळे यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.राज्यस्तरारावर कुस्ती खेळलेल्या नाशिकच्या बाळू बोडके आणि हरियाणाच्या राकेश कुमार यांच्यात रंगलेला अंतिम सामना अर्ध्या तासांनंतरही अनिर्णित राहिला.
           यावेळी वाडा तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक योगेश पाटील, नाणे सांगेचे उपसरपंच अतुल पाटील, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त माजी सरपंच अनिल पाटील, शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, भिवंडीचे प्रसाद पाटील,जयेश चौधरी,मोतीराम पाटील,विनिद भोईर,दिनेश खिलारे,योगेश वरठा व पंचक्रोशीतील कुस्ती रसिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
          स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बुवा ग्रुपचे पराग पाटील, लोकेश जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.

comments

About Rajtantra

Scroll To Top