डॉ. हेमंत मुकणे यांच्या पुस्तकांचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन

0
10
Rajtantra_EPAPER_310318_1_120346प्रतिनिधी
जव्हार, दि. ३०: पालघर जिल्ह्यातील जव्हार संस्थानाच्या उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून    प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवेदनशील मनाने लिखाण केलेले जव्हार संस्कृतीची शोधयात्रा” आणि जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा. अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन  दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.
              जव्हार संस्थानाची ऐतिहासिक माहिती या तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतीक आणि जव्हारच्या लोकसंस्कृतीचे विविध पैलू प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी उलगडून दाखविले आहे. हा ऐतिहासिक पुस्तकांचा प्रकाशन  सोहळा शुक्रवारी गांधी चौक येथील टाऊन हॉल जुन्या नगरपरिषद कार्यलयात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व डॉ .सर .मो .स गोसावी जेष्ठ शिक्षणतज्ञ व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
               यामध्ये  “जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या  संस्कृतीची शोधयात्रा या पुस्तकात संस्थान कालीन पार्श्वभूमीचे लिखाण केले असून, यामध्ये जव्हार संस्थानातील गड किल्ले, राजवाडे, गढी,  इथली वारली कला, आदिवासी नृत्य, तारपा नृत्य,  स्त्री-पुरुषांचा एकमेकांच्या कमरेभोवती हातांचा वेटोळे घालून लयबध्द पदन्यास, नृत्य, विविध फुलमाळांच्या वेण्यांनी सजविलेला केशसंभार, संगीत वाद्यांचा व तारप्याचा मद्यधुंद करणारा  स्वरध्वनी संगीताचा अविष्कार यावर लिखाण केले आहे.
           जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा या पुस्तकात शिक्षक , राजकारणी , समाजसुधारक , चित्रकार , संगीत कलावंत , पत्रकार विधिज्ञ , डॉक्टर , आणि उद्योजक यांची चरित्र व चांगुलपणाचा शोध घेणारी असल्यामुळे या सर्व व्यक्तीची सदगुणांची आरास या पुस्तकात मांडली आहे .या पुस्तकातील चरित्रयोग हा डॉ .मुकणे यांच्या जीवनातील भक्तियोग असावा या थोर व्यक्तींना त्यांनी जवळून पाहिले आहे तसे त्या व्यक्तीच्या चरित्राचे त्यांना विलक्षण आकर्षण आहे हे पुस्तक पुढच्या पिढीला स्फूर्ती देणारे , प्रकाशवाट दाखविणारे ठरणार आहे . या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
           प्रा.डॉ. हेमंत मुकणे यांनी लिखाण करण्यासाठी गेली चार वर्ष मुकणे यांनी माहिती गोळा लिखाण केले.यासाठी त्याच्या पत्नी व मातोश्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले अश्या या  दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा,  ज्येष्ठ शिक्षण तज्ञ महासंचालक गो.ए.सोसायटीचे संचालक डॉ. सर मो .स.गोसावी, डॉ. के .आर .शिंपी , डॉ .डी .के .गोसावी माजी प्राचार्य , राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, ऍड वासुदेव गांगल,विधीतज्ञ  जव्हार न.पा. नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, संदीप वैद्य, डॉ. प्रा. श्रीनिवास जोशी, शलाका हेमंत मुकणे सहकुटुंब , अन्य मान्यवर, नागरिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email

comments