दिनांक 16 January 2019 वेळ 4:31 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न

निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न

1 - Copyराजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर दि. २९: निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता पालघरचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण महाजन, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र केळकर, विरारच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उपायुक्त, दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेचे (एनजीओ) पदाधिकारी तसेच अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
या चर्चासत्रामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग व्यक्तींच्या मतदार. नोंदणीबाबत तसेच दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या मतदान केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात येत असून या सर्व व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहितीही या चर्चासत्रातून देण्यात आली, तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेवेळी येणाऱ्या अडचणी व आव्हानांबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले. ह्या मुद्द्याची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नणंद घेऊन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मांडण्यात येणार आहेत. दरम्यान या चर्चासत्राला संबंधी एनजीओ व दिव्यांग व्यक्तींचा चांगला प्रस्तिसाद मिळाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top