दिनांक 16 January 2019 वेळ 3:39 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन

पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन

IMG-20180328-WA0028वार्ताहर 
बोईसर दि. 28
तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर फांडातून पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर रस्त्याचे काल  स्थळ निर्देशक तारापूर  हेमंत कुमार यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले.
            पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर विभागाकडे पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यास प्रतिसाद देत सीएसआर विभागाने या रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. नुकतेच या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून काळ त्याचे उदघाटन करण्यात आले. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे येथून प्रवास करणाऱ्या अक्करपट्टी व पोफरंण या प्रकल्पग्रस्त गावासह भेदवाड, दहिसर, जांभळे. आदी गावांतील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
           या उदघाटन प्रसंगी मुख्य अभियंता आर भारद्वाज , सीएसआर अध्यक्ष अभिजित कुलकर्णी , सचिव प्रिया कर्वे , सदस्य जयदेव शील , एस डी परसवार, एम एन वर्मा , डॉ मेरी कुट्टी डॅनियल ,एस नागराजन , बी व्हाय कोरे , एन बी बारी , आर जी शेट्टी , एस एन धोते या कार्यक्रमाला  उपस्थित होते .

comments

About Rajtantra

Scroll To Top