दिनांक 16 January 2019 वेळ 3:12 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.

मुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.

20180324_112141
प्रतिनिधी कुडूस दि. २५ मुंबईस्थित मुक्तांगण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुडूस विभागाती
ल अंगणवाडी सेविकांना कला व कौशल्य या विषयी प्रशिक्षण दिले. अंगणवाडी सेविकांनी या वेळी प्रत्यक्ष धडे गिरवल्याने ज्ञान पक्के झाल्याची प्रतिक्रिया लर्निंगस्पेसचे आशिष बिजावर्गी यांनी दिली.

मुक्तांगण  संस्थेच्या वतीने अंगणवाड्या व प्राथमिक शाळातील भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याची पूर्व माहिती
गणेशपुरी येथील लर्निंगस्पेस या संस्थेकडून पुरविली जाते. त्यानुसार आपल्या फंडातून मुक्तांगण ही संस्था आवश्यक ते शाळा गृहाचे नुतनीकरण, शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, भौतिक सुविधा उपलब्ध करून देते. चिंचघर येथील शंकरराव हरी पाटील  सभागृहात झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणातून कुडूस परिसरातील 60 अंगणवाडी सेविकांना चित्रकला व क्राफ्ट कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. मुक्तांगणच्या मुख्य शिक्षिका झेनब भिंडरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली हसत खेळत पार पडलेल्या या  प्रशिक्षण  कार्यशाळेत  गणेशपुरीतील लर्निंगस्पेस फौंडेशनच्या शिक्षिकांनी धडे दिले
लर्निंगस्पेसचे प्रकल्प अधिकारी आशिष बिजावर्गी हे म्हणाले, गेली दहा वर्षे आम्ही हे काम करीत आहोत. भिवंडीतील 154 प्राथमिक शाळा व वाडा तालुक्यातील अंगणवाड्या आम्ही दत्तक घेतल्या असून या सर्व शाळा व अंगणवाड्या आम्ही डिजिटल करणार आहोत. त्याच बरोबर इंग्रजी बोलणे व लिहीण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.  आम्हाला कुडूस विभागातील अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षिका प्रतिभा पष्टे यांचे चांगले सहकार्य मिळाल्याचेही बीजवारणी यांनी नमूद केले.
या प्रशिक्षण वर्गाला प्रा.धनंजय पष्टे यांनी मार्गदर्शन केले तर प्रतिभा पष्टे यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाचे महत्व सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top