दिनांक 16 January 2019 वेळ 3:21 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » चिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

चिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

 
डहाणू दि २५: विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून प्रभावी शिक्षण देता यावे याकरिता,
विद्यार्थ्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन शिक्षकांना शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व फिल्म मेकिंगच्या तंत्रज्ञानाचा परिचय करुन देण्यासाठी चिंचणी येथील श्रॉफ महाविद्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात करण्यात आले. भूषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांच्या नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेने चिंचणी तारापूर एज्युकेशन ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील यांच्या सहयोगातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन (२४ मार्च) आमदार निरंजन डावखरे यांनी केले. अध्यक्षपदी रजनी_facebook_1521983017383कांत श्रॉफ होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेला पालघर जिल्ह्यासह दूरदूरचे शिक्षक उपस्थित होते. भूषण कुलकर्णी यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ॲंड्रॉ
ईड स्मार्टफोनद्वारे ऑडिओ व व्हिडिओ कसे तयार करायचे व त्यावर तांत्रिक सोपस्कार कसे करायचे याबाबत अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तर कोरे यांनी त्यासाठी लागणारी अतिरिक्त सामुग्री माफक दरात उपलब्ध करुन त्याविषयी मार्गदर्शन केले. याबाबतची प्रात्यक्षिके देखील दाखवली.
आज (२५ मार्च) कार्यक्रमाचा समारोप रजनीकांत श्रॉफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी यावेळी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवल्या. मोबाईल / कॉम्पुटर वर प्रोफेशनल ध्वनीमुद्रण व संकलन, कवितांचे ध्वनी मुद्रण, मोबाईल प्रोफेशनल व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी टेक्निक, दर्जेदार ध्वनी मुद्रणासह व्हिडीओ शुटींग, गणित / विज्ञान
पाठांचे व्हिडीओ रूपांतरण, मोबाईल मल्टीकॅम टेक्निक, मोबाईल फिल्म मेकिंग, क्रोमा इफेक्ट याचा शिक्षण क्षेत्रात कसा लाभ होऊ शकतो याबाबतचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे सर्वांना नवी दिशा मिळाली होती.
संजीव जोशी व विनीत पाटील यांनी आपले विचार मांडल्यानंतर अध्यक्षीय स्थानावरून बोलताना, अशा उपक्रमाचा वाऱ्याच्या वेगाने प्रसार करा असे आवाहन श्रॉफ यांनी उपस्थितांना केले व पुन्हा अशी कार्यशाळा चिंचणी येथे व्हावी अशी अपेक्षाही श्रॉफ यांनी व्यक्त केली. प्रतिभा क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top