दिनांक 21 May 2019 वेळ 12:17 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » पालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक

पालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक

राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि . २१ मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक करून तिच्या कानशिलात लगवणाऱ्या मुजोर प्रवाशाला पालघर पोलीसांनी अटक केली आहे.
पालघर एसटी आगाराकडून रात्री ९. ४५ वाजता स्टेशन ते सातपाटी बस सेवा पुरवली जाते. मुंबईहून येणारी लोकशक्ती एक्स्प्रेस ट्रेन अनेकवेळा पालघर स्थानकात उशिरा पोहोचत असल्याने व हि बस सुटल्यानंतर या मार्गावर दुसरी बस फेरी नसल्याने या ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची हैरसोय होऊ नये यादृष्टीने ९.४५ ची बस लोकशक्ती ट्रेन येईपर्यंत थांबवली जाते. सोमवारी दि.(१९) नेहमीप्रमाणे लोकशक्तीमधील प्रवाशांसाठी बस थांबवली असताना एका मुजोर प्रवाशाने बस नियमित वेळेपेक्षा लवकर सोडण्यासाठी वारंवार बसची बेल वाजवून आरडाओरड सुरु केली. त्यानंतर आपल्या कर्तव्यावर असलेल्या ३५ वर्षीय एसटी कंडक्टरशी वाद घालत तिला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. याप्रकरणी महिला कंडक्टरने पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानांत पोलिसांनी सादर प्रवाशांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३५३, ५०४,व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला काल, मंगळवारी अटक करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top