दिनांक 18 June 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर

उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर

LOGO 4 Onlineराष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार हे उद्या, २४ मार्च रोजी डहाणू येथे येत असून ते विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. डहाणू औष्णिक विज प्रकल्पातील सभागृहात सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते लोकांना उपलब्ध असतील. डहाणू तालुक्यावर उद्योगबंदी लादणारी १९९१ ची केंद्र सरकारची अन्यायकारक अधिसू्चना रद्द करण्यासाठी अनुभवी नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या उपलब्धतेचा लोकांनी लाभ उठवावा असे आवाहन माजी नगरसेवक, तथा लघु उद्योजक रविंद्र फाटक यांनी सोशल मिडीयावरुन केल्यामुळे या प्रश्नाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. फाटक हे अलीकडेच पार पडलेल्या डहाणू नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले असताना त्यांच्या या संदेशातून ते भाजपमध्ये स्थिर होऊ न शकल्याचे स्पष्ट होत

वाढवण बंदर, दापचरी औद्योगीक वसाहत अशा प्रकल्पांचे स्वागत – रविंद्र फाटक
डहाणूतील औष्णिक विज प्रकल्पाला परवानगी दिली जाऊ नये याकरिता, टाटा उद्योग समुहाकडुन स्थानीक पर्यावरणवादी संघटनांना बुध्दीभेद करणारी व पर्यावरणाला धोका उत्पन्न होऊन स्थानीक बागायती उध्वस्त होईल, तसेच रोजगार महाग होईल अशी भिती दाखवली गेली. प्रकल्पाला विरोध निर्माण झाला व या गैरसमजातून निर्माण झालेल्या विरोधापुढे तत्कालीन जनता पार्टी शासित केंद्र सरकार झुकले. त्यातून अन्यायकारक असे १९९१ चे डहाणु नोटीफीकेशन जारी करण्यात आले. या नोटीफिकेशनला दिवंगत खासदार चिंतामण वणगांसह जवळपास सर्वच स्थानिक नेत्यांचा विरोध होता. असे डहाणूची प्रगती रोखणारे नोटिफिकेशन रद्द करुन सरकारने वाढवण बंदर, दापचरी औद्योगीक वसाहत याद्वारे, तसेच डहाणुचा पर्यावरणाचा समतोल राखुन विकास होईल असे सर्व उद्योग डहाणु तालुक्यात आणले पाहिजेत. या प्रश्नात राजकारण न आणता सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा माजी नगरसेवक, तथा लघु उद्योजक रविंद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे.
वाढवण बंदर लादून मच्छीमारांना देशोधडीला लावू नये – शशांक पाटील
प्रस्तावित वाढवण बंदर उभारल्यास उत्तन पासून ते नारगोळ पर्यंतचा मच्छीमार उध्वस्त होणार असताना व या प्रकल्पाबद्दल स्थानिकांचा विरोध असताना विरोध नसल्याचे भासवणे गैर असल्याची भूमिका बहुजन विकास आघाडीचे डहाणू प्रभारी शशांक पाटील यांनी दैनिक राजतंत्रकडे मांडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी जुळवाजुळव करण्याच्या हेतूने डहाणूला येत असून ते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष डहाणूवर १९९१ च्या अधिसू्चनेद्वारे लादलेल्या औद्योगिक बंदीचा राजकीय फायद्यासाठी वापर करीत आहेत असा आरोपही पाटील यांनी केला आहे. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्यास विरोध नाही. मात्र वाढवण बंदराला बविआचा तिव्र विरोध राहील. तसेच दापचरी दुग्ध प्रकल्पाची जागा आता आदिवासींना परत करावी अशीही आमची मागणी असल्याचे पाटील म्हणाले.

comments

About Rajtantra

Scroll To Top