दिनांक 25 August 2019 वेळ 1:45 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू

निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू

प्रतिनिधी
वाडा, दि. २०:  तालुक्यातील सर्वाधिक  वर्दळीचा  अंतर्गत  समजला  जाणारा  कुडूस – चिंचघर- गौरापूर  या  रस्त्याचे  काम  अतिशय  निकृष्ट दर्जाचे होत  असून  यास  जबाबदार  असणाऱ्या  ठेकेदार  व  शाखा  अभियंता  यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल  करावा  या मागणीकडे  प्रशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी
 कुणबी  सेनेने  आजपासूIMG_20180320_132832न  तहसीलदार  कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  या  उपोषणामुळे  बांधकाम  प्रशासनाचे   धाबे दणाणले आहेत. 
             कुडूस –
चिंचघर – गौरापूर  हा १२ किमी  अंतराचा  रस्ता  असून  पंतप्रधान  ग्रामसडक  योजनेतून  हा  रस्ता  मंजूर  झाला आहे. या  रस्त्यासाठी ९  कोटी ४०
लाखांचा निधी मंजूर झाला असून  कुडूस  ते  चिंचघर  हा  १३५० मीटर पर्यतचा रस्ता  क्राॅकीटीकरण  होणार  असून  चिंचघर  ते  गौरापूर  रस्ता  डांबरीकरण  होणार आहे.  रस्त्याचे  काम  सांगळे  कंट्रक्शन कंपनीला  देण्यात आले आहे.  कंपनीने  सबठेका ठेकेदार  संदीप  गणोरे व हर्षद  गंधे यांना  दिले आहे.  रस्त्याचे काम सुरू  असून  ते  निकृष्ट दर्जाचे  होत  असल्याचा आरोप  कुणबी  सेनेने  केला आहे.
            रस्त्यासाठी वापरले  जाणारे  साहित्य  हे  अंदाजपत्रकानुसार  वापरले जात नाही.  या  रस्त्यावर  लॅब  असणे  गरजेचे आहे.  मात्र  ती  कुठेही  दिसत नाही.  माती  मुरूम  याच्या  चाचण्या  घेतल्या  जात  नाहीत.  मो-यांसाठी  वापरल्या जाणाऱ्या पाईपला  दोन्ही  बाजूंनी  क्रेसिंग करून  पाईप  टाकला  पाहिजे.  परंतु  तसे  नियमानुसार  होत नाही.  त्यामुळे  रस्त्यावर  दाब  आल्यास  पाईप  फुटण्याची  शक्यता आहे.  विशेषत  पाईप  टाकण्याआधी त्याखाली  काही  जाडीचे  क्राॅकीटीकरण  करावयास  पाहिजे  मात्र  ते  त्या  जाडीचे  होत नाही.  जे  खडीकरण  केले आहे ते  बरोबर  दाबले  गेले  नसल्याने  रस्ता  उखडला  गेला आहे.  सिमेंट  कामावर  काही  दिवस  पाणी  मारणे  गरजेचे असते  मात्र  येथे  पाणीच  मारण्यात आले  नाही.  रेती  ऐवजी  गिरीट पावडर  कामात  वापरली  जाते.  असे  अनेक  आरोप  कुणबी  सेनेचे  उपतालुकाप्रमुख  प्रदीप  हरड  यांनी  केले  आहेत.
       निकृष्ट  दर्जाचे  काम  करून  शासनाच्या  पैशाचा  अपव्यय  करणा-या ठेकेदार  व  त्यावर  नियंत्रण  ठेवणारे  शाखा  अभियंता  यांच्यावर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हरड  यांनी केली आहे.  मागणी  मान्य  होईपर्यंत  उपोषण  सुरूच राहील  असा  निर्धार  उपोषणकत्याने केला आहे.
        यासंदर्भात पंतप्रधान  ग्रामसडक  योजनेचे  कार्यकारी अभियंता  रविंद्र  दुधे  यांच्याशी संपर्क साधला असता  सदर  रस्त्याच्या दर्जाबाबत  येत्या  २६  ते  ३० मार्च २०१८ पर्यंत  चाचणी  करून  घेण्यात  येईल त्यानंतर  रस्त्याच्या  दर्जाबाबत  समजू  शकेल अशी  माहिती त्यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top