दिनांक 21 October 2019 वेळ 3:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » सूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण

सूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण

वार्ताहर :,
बोईसर दि. २० :
आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील सूर्या धरणांमधून स्थानिकांना सिंचनासाठी पाणी न देता ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याचा शासनाचा प्रयत्न हणून पाडण्यासाठी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने काल, सोमवारपासून पालघर येथील हुतात्मा चौक येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आजहा या उपोIMG-20180320-WA0002षणाचा दुसरा दिवस असून विविध संघटना व राजकीय पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

सूर्या   प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आरक्षित केले असुन प्रकल्पाचे ८० टक्के काम वसई विरार व मीरा भाईंदरला वळविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार हजार हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहणार आहे. याचा शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन जिल्ह्यातील कुपोदरम्यान काही दिवसांपूर्वीच धरणानजीक सुरु असलेले सर्वेक्षणाचे काम स्थानिक ग्रामस्थ व सूर्या बचाव आंदोलन समितीने बंद पाडले होते. तसेच त्यातही सर्व मशिनरी हुसकावून लावण्यात आली होती.
शैवसिनेचा उपोषणास पाठिंबा
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आज उपोषण कर्त्यांची भेट घेत आपला उपोषणास पाठिंबा असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. आम्ही सत्तेत असलो तरी स्थानिकांसोबत सेनेची नाळ जोडली असल्याने सेने स्थानिक शेतकऱ्यांसोबत असल्याचे मत सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी पालघर जिल्हा सह संपर्क प्रमुख कितें पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंटे व पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे उपस्थित होते.षण व स्थलांतर वाढेल. तसेच येथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याच बरोबर वाडा व जव्हार तालुक्यासाठी पिंजाळ सिंचन प्रकल्प गुंडाळून या प्रकल्पाचे सर्व पाणी देखील मुंबईला नेण्यात येणार आहे. उपोषणाला जिल्ह्यातील २१ संघटनांसह अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे

 

comments

About Rajtantra

Scroll To Top