दिनांक 23 June 2018 वेळ 3:10 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हापरिषदच्या विविध विकास कामांचा सेना जिल्हाप्रमुख शहांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हापरिषदच्या विविध विकास कामांचा सेना जिल्हाप्रमुख शहांच्या हस्ते शुभारंभ

BOISAR-NEWS

वैदेही वाढाण/बोईसर :शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शुभांगी राजेश कुट्टे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या तारापूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालघरचे आमदार अमित घोडा, शुभांगी राजेश कुटे, सुधीर तामोरे, ज्योती मेहेर, प्रभाकर राऊळ, श्वेता देसले, तुळशीदास तामोरे, सुशील चुरी, राजेश कुटे, तारापुरचे सरपंच कल्पेश पिंपळे, घिवलीचे उपसरपंच वैभव मोरे, देवानंद मेहेर, नंदकुमार नाईक उपस्थित होते. शुभारंभ झालेली कामे पुढीलप्रमाणे आहेत. १) तारापूर – कामोडा रस्ता (४२ लाख रु.) २) तारापूर समुद्र किनाऱ्यावर मासळी सुकविण्यासाठी शेड (१० लाख रु.) ३) तारापूर – सावराई रस्ता (२८ लाख रु.) ४) तारापूर येथे प्रत्येकी ४ लाख रुपये खर्चाच्या ३ मोऱ्या ५) पशुवैद्यकीय दवाखाना (२० लाख रु.)

comments

About Rajtantra

Scroll To Top