दिनांक 21 May 2019 वेळ 12:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम

LOGO 4 Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. १० : राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण – २०१५ अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांना, महिलांना स्थानिक गरजेनुसार कृषी व कृषीपूरक व्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यासाठी तसेच ग्रामीण भागाआत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (एस. टी. आर. आय.) देण्याचा कार्यक्रम राज्यात राबिवण्यात येत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात २ प्रशिक्षण वर्ग प्रत्येकी १५ याप्रमाणे एकूण ३० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ७ दिवसाचा असून पालघर कृषी संशोधन केंद्र येथे भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयाचे तर धनु तालुक्यातील कोसबाड कृषी संशोधन केंद्र येथे अळिंबी संवर्धन या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
वर नमूद विषयांचे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक युवकांनी त्यांचे अर्ज भरून प्रकल्प संचालक कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) पालघर, साई प्रसाद बिल्डिंग. मोहापाडा, लोकमान्य नगर, नवली पालघर (प.), पिन. – ४०१४०४ या कार्यालयाकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top