दिनांक 16 January 2019 वेळ 3:15 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » शिक्षक सेनेच्या वतीने महिला शिक्षिकांचा सत्कार

शिक्षक सेनेच्या वतीने महिला शिक्षिकांचा सत्कार

IMG_20180310_162620वाडा, दि. ११: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शनिवार दिनांक १० मार्च रोजी तालुक्यातील महिला शिक्षिकांसाठी स्नेहमेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विशेष कार्य करणाऱ्या नऊ शिक्षिकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
        शैक्षणिक क्षेत्रात महिला शिक्षिकांचे कार्य उल्लेखनीय असून सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याचे काम आपापल्या घरातील कर्तव्ये पार पाडून शिक्षिका करत असतात त्यामुळे त्यांचे या क्षेत्रातील योगदान खूप मोलाचे असल्याचे गौरवोद्गार पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. शिक्षक सेनेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमास महिला शिक्षिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
         राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका वैष्णवी वैभव गव्हाळे, शाळा अनगाव यांच्या सह रंजना अशोक पाटील, शाळा डाकीवली,  अस्मिता अरविंद भोईर, शाळा केळठण, अर्चना भास्कर पाटील, शाळा कुडूस, निलोफर अजीज शेख, शाळा मोहट्याचा पाडा, साधना मुकेश भानुशाली, शाळा जामघर, हर्षला हरेश पाटील, शाळा गावठाण पाडा, शर्मिला पांडुरंग पाटील, शाळा ऐनशेत, शर्मिला शंकर दळवी, शाळा करंज पाडा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान ‘ हसू आणि आसू ‘ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम ठाणे येथील योगेश जोशी यांनी सादर केला.
     कार्यक्रमास वाडा नगर पंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटक संगिता ठाकरे, गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव, वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, शहर प्रमुख प्रकाश केणे, नगर सेविका वर्षा गोळे, नयना चौधरी आदी मान्यवरांसह शिक्षक सेनेचे मनेश पाटील, आत्माराम हरड, अविनाश सोनावणे, दिनेश खिलारे, हेमंत बोंद्रे आदी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top