दिनांक 16 January 2019 वेळ 4:26 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » १२ मार्च पासून पालघर जिल्ह्यात पोलीस भरती

१२ मार्च पासून पालघर जिल्ह्यात पोलीस भरती

Maharashtra-Police-jobRAJTANTRA MEDIA

१२ मार्च पासून पालघर जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने पोलीस शिपाई पदासाठी भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ कॅमेरांद्वारे नजर ठेवली जाणार असून हे कॅमेरे यूट्यूबशी जोडले जाणार आहेत. यामुळे कोणालाही घरबसल्या भरती प्रक्रियेवर नजर ठेवता येईल. भरती प्रक्रियेसाठी आलेले अधिकारी व कर्मचारी यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवली जाणार आहे. १६०० मीटर व १०० मीटर धावण्याच्या परीक्षेसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस वापरले जाणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होणार असून लोकांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये व कुणी भरतीसाठी पैसे मागत असेल तर त्वरित पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top