दिनांक 23 February 2019 वेळ 8:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » त्वरित मदत न दिल्याप्रकरणी बीएआरसीचे फायर ऑफिसरवर गुन्हा

त्वरित मदत न दिल्याप्रकरणी बीएआरसीचे फायर ऑफिसरवर गुन्हा

Boisar Novaphene FireRAJTANTRA MEDIA

बोईसर येथील औद्योगिक वसाहतीत ८ मार्च रोजी रात्री नॉव्हेफेन व अन्य ५ रासायनिक कारखान्यांना आग लागल्याप्रकरणी त्वरित मदत न दिल्याच्या आरोपाखाली पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी भाभा अनु संशोधन केंद्राचे अग्निशमन अधिकारी बोरकर यांचे विरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आगीत ३ जणांचा मृत्यू झाला होता. आग लागल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोरकर यांना फोन केला असता त्यांनी, मला वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अग्निशमन वाहने बाहेर पाठविता येणार नसल्याचे सांगितले. या कारणाने त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५६ व ५७ अन्वये गुन्हा केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. भाभा अणुशक्ती केंद्रातील अग्निशमन यंत्रणेला बाहेरील कॉल अटेण्ड करताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. तसे केंद्र संचालकांचे निर्देश असल्याचे सांगण्यात येते. असे असल्यास जिल्हाधिकारी व पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित बातमीसाठी खालील लिंकला भेट द्या!

बोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू

comments

About Rajtantra

Scroll To Top