दिनांक 23 February 2019 वेळ 8:23 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सूर्या पाणी बचाव आंदोलन समितीने सर्वेक्षणाचे काम बंद पाडले

सूर्या पाणी बचाव आंदोलन समितीने सर्वेक्षणाचे काम बंद पाडले

Sorry, there are no polls available at the moment.

Surya AndolanRAJTANTRA MEDIA

आदिवासी उपयोजनेतून बांधण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील सूर्या धरणांमधून स्थानिकांना सिंचनासाठी पाणी न देता ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याच्या शासनाच्या धोरणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे. हे पाणी मीरा रोड व वसई विरार महापालिका क्षेत्रात वळविण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र आधीच वाढावं बंदर, इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, मुंबई बडोदा महामार्ग, रिलायन्सची पाईप लाईन, बुलेट ट्रेन अशा प्रकल्पानी पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र मेटाकुटीला आलेला असल्यामुळे लोकांमध्ये सरकार विरोधी वातावरण आहे. अशातच सूर्या प्रकल्पाचे पाणी बाहेर वळविण्यास स्थानिकांच्या असलेल्या विरोधास न जुमानता धरणा नजीक सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले होते. हे कळताच स्थानिक ग्रामस्थांना सूर्या बचाव आंदोलन समितीने बळ देऊन काम बंद पाडले. तेथील सर्व मशिनरी हुसकावून लावण्यात आली. यावेळी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जितेंद्र राऊळ, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, पांडुरंग बेलकर, स्थानिक सरपंच शिवराम काकड, वेती वनहक्क समितीचे प्रकाश हाडळ उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top