दिनांक 11 December 2018 वेळ 2:21 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » संजय पाटील यांची शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय पाटील यांची शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Sorry, there are no polls available at the moment.

Sanjay PatilRAJTANTRA MEDIA

डहाणू दि. ११: येथील माजी नगरसेवक संजय पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पाटील हे स्वतः शिक्षक असून सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. यापूर्वी ते डहाणू नगरपरिषदेचे सदस्य होते. सध्या त्यांच्या पत्नी शिवसेनेतर्फे डहाणू नगरपरिषद सदस्य आहेत.
यापूर्वी संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. २०१२ च्या डहाणू नगरपरिषद निवडणुकीत पाटील यांनी शशिकांत बारी यांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या कारणाने त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाई केली होती. २०१७ च्या डहाणू नगरपरिषद निवडणुकीत पाटील यांनी शिवसेनेला बळ दिले आणि सेनेच्या २ जागा निवडून आल्या. संघटन कौशल्य असलेल्या पाटील यांचा शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो. हे हेरून त्यांच्यावर शिक्षक सेनेने पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top