दिनांक 25 March 2019 वेळ 5:24 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » कुडूस येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी. पोलीस महानिरीक्षकांना दिले निवेदन.

कुडूस येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी. पोलीस महानिरीक्षकांना दिले निवेदन.

 20180308_105032प्रतिनिधी:
कुडूस येथील  वाढत्या लोकसंख्येचा व वाढत्या कारखानदारीचा विचार करून  स्वतंत्र    पोलीस ठाण्याची मागणी येथील कार्यकर्त्यांनी पोलीस महानिरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
          कुडूस हे 23  हजार लोकसंख्येच्या वर वस्ती असलेले गाव असून यात परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने आहे. 23 गाव व 15 पाड्यांचा समावेश असलेल्या कुडूसमध्ये लोकसंख्या वाढत असतानाच गुन्हेगारी कारवायांना कुडूस सब स्टेशनमधील  तुटपूंजी पोलीस यंत्रणा तोंड देवू शकत नाही. कुडूस येथील सबपोलीस स्टेशनमध्ये केवळ एक अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी आहेत. यातील कामानिमित्त वाडा, पालघर असे काही कर्मचा-यांना जावे लागते. परिणामी छोट्या मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्यानंतर तत्पर कार्यवाहीसाठी पोलीस उपलब्ध नसतात अथवा एकटा दुकटा कर्मचारी मोठ्या घटना घडल्यानंतर कारवाई करतांना दोन्ही बाजूंच्या दबावाने विचलीत होतो.
          चोरी, मारामारी,कारखान्यातील गुन्हेगारी घटना, शाळातील गैरप्रकार, गाव पाड्यातील अनैतिक धंदे, रस्त्यावरील रहदारीचे नियंत्रण या सर्व बाबींचा विचार करता येथील तुटपुंजी पोलीस यंत्रणा तोंड देवू शकत नाही. मोठ्या घटनात तक्रार करण्यासाठी वाडा येथे जावे लागते. परिणामी वेळ, पैसा यांचा अपव्यय होतो. कुडूस येथे पोलीस ठाण्याच्या मालकीची सहा गुंठे जागा आहे. येथेच सध्याचे पोलीस ठाण्याचे कार्यालय आहे. शंभर वर्षांपूर्वीची ही चाळ आता पडकी झाली असून याच जागेवर दोन मजली इमारत उभारण्यात यावी अशी मागणी आहे. यासाठी हवे ते योगदान देण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते ओम प्रकाश शर्मा, मुस्तफा मेमन, डाॅ.गिरीश चौधरी, अल्लारख मेमन, ईरफानभाई सुसे यांनी दिले आहे.
           स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी करणारे निवेदन पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग परिक्षेत्राचे नवल बजाज यांच्याकडे देण्यात आले असून बजाज यांनी वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी व त्यातील वाढते प्रमाण, वाढती कारखानदारी या सर्व बाबींचा विचार करून वरिष्ठ पातळीवरून या बाबत पाठपुरावा करेन व परवाणगी येताच आपल्याला कळविले जाईल. असे सांगितले. या वेळी वाडा विकास समितीचे ईरफानभाई सुसे, मुस्तफा मेमन, डाॅ.गिरीश चौधरी, सचिन जाधव, रफीक मेमन, रामचंद्र भोईर, योगेश भानुशाली,सदा देशमुख, अशोक पाटील हे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा यांच्या हस्ते निवेदन देतांना  उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top