केंद्राचे स्वागतार्ह्य पाऊल

0
93

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल क्षेत्राचे निकष ठरवण्यासाठी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एप्रिल 1999 मध्ये नेमला अभ्यासगट


भाग 13 वा: केंद्राचे स्वागतार्ह्य पाऊल


[highlight]संजीव जोशी (दैनिक राजतंत्र च्या दिनांक २८ जुलै २०१५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध):[/highlight]
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल क्षेत्राचे संरक्षण व नियमन करण्यासाठी कृती योजना आखायचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ठरवले. त्याआधीच देशात अनेक क्षेत्रे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल जाहिर करण्यात आली होती. परंतू असे क्षेत्र जाहिर करताना या प्रक्रियेचा उद्देश, शास्त्रीय आधार स्पष्ट झाले पाहिजेत व प्रक्रियेत पारदर्शकता आली पाहिजे, या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिनांक 6 एप्रिल 1999 रोजी केंद्रीय नियोजन आयोगाचे सल्लागार डॉ. प्रणब सेन यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला.
या अभ्यासगटामध्ये 2) प्रा. फादर सलदान्हा, सेंटर फॉर टॅक्सोनॉमिक स्टडीज, बेंगलोर 3) प्रा. सी. के. वर्ष्णेय, स्कुल ऑफ एन्वायरोन्मेंट सायन्सेस, नवी दिल्ली 4) डॉ. व्ही. सिंग, अतिरिक्त प्रभारी संचालक, बॉटनीकल सर्वे ऑफ इंडीया, कलकत्ता 5) डॉ. जे. आर. बी. अल्फ्रेड, संचालक, झ्युओलॉजीकल सर्वे ऑफ इंडीया, कलकत्ता 6) प्रा. एस. के. मुखर्जी, संचालक, वाईल्ड लाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडीया, डेहराडून 7) प्रा. सतिष चंद्र, माजी संचालक, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, उत्तर प्रदेश 8) शयाम चैनानी, बॉम्बे एन्वायरोन्मेंट ऍक्शन ग्रुप, मुंबई 9) क्लॉड अल्वारीस, गोवा फाऊंडेशन, गोवा यांचा समावेश करुन 10) डॉ. के. पी. एस. चौहान, अतिरिक्त संचालक, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांना सदस्य सचीव करण्यात आले. त्यानंतर लगेचच या गटामध्ये 11) डॉ. एस. एन. कौल, प्रभारी संचालक, निरी (नागपुर) 12) श्रीमती के. रघुनाथ, नवी दिल्ली 13) डॉ. दिपक आर. सावंत, चेअरमन, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमीटेड, मुंबई यांचा समावेश करण्यात आला.
या अभ्यासगटाने सर्वप्रथम पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिलतेची व्याख्या ठरवली. अ) जगातुन जिवसृष्टीच्या घटकाचे न भरुन येणारे नुकसान होणे अथवा नष्ट होणे ब) निसर्गचक्राप्रमाणे जिवसृष्टीचे अस्तित्व व पुनरुत्पादन या प्रक्रियेचे अपरिमीत नुकसान होणे. या व्याख्येमध्ये बसणारे 13 विषय निश्‍चित करण्यात आले. या 13 विषयांची वर्गवारी 3 प्रमुख गटांत करण्यात आली.
जिवसृष्टीच्या प्रजातींवर आधारीत:
1) स्थानिकता: जिवसृष्टीतील एखादी प्रजाती एखाद्या विशिष्ठ भागातच आढळत असेल व जगात अन्यत्र कुठेही आढळत नसेल तर.
2) दुर्मिळता: एखादी प्रजाती खुपच दुर्मीळ आहे व ती विशिष्ठ भागात आढळते. ती संकटात नसली तरी दुर्लक्ष केल्यास नामशेष होण्याचा धोका वाटतो अशी प्रजाती.
3) संकटग्रस्त प्रजाती: नजिकच्या काळत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती
4) मुळ प्रजाती: जिवसृष्टीतील अशा प्रजाती ज्या संकरीत करण्या/होण्याआधी मुळच्या जशा होत्या अशा प्रजाती.
अशा प्रजाती जेथे आढळत असतील अशा क्षेत्रांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल क्षेत्र मानता येईल.
डहाणू तालुक्यात अशा कुठल्याही प्रजाती ( झाडे/प्राणी/पक्षी/मासे ) आढळत नाहीत. चिकु या प्रजातीत बसत नाही. चिकु हे फळ मुळचे ब्राझीलचे असुन ते आपल्या वातावरणात टिकेल अशा राजणाच्या झाडावर कलम करुन चिकुचे झाड तयार केले जाते. चिकुचे झाड स्थानिक नाही, दुर्मीळ नाही, नामशेष होण्याच्या मार्गावर नाही, ते मुळ प्रजातीचे नाही, ते फक्त डहाणूतच होते अशी परिस्थिती नाही. तो डहाणुचा वारसा देखील नाही. ते राष्ट्रीय फळ देखील नाही. ते वनविभागाने अधिसुचित केलेले व कापण्यास मनाई असणारे झाड नाही. चिकु झाडांतुन वातावरणात जास्त ऑक्सिजन सोडला जातो किंवा त्यामुळे जमीनीची धुप थांबते अथवा पाऊस पडतो असा निष्कर्ष आजपर्यंत कुठल्या शास्त्रज्ञाने काढल्याचे ज्ञात नाही.
पर्यावरणावर आधारीत
5) वन्यजिव मार्गीका:
वन्यजिवांचे वास्तव्य असणार्‍या भिन्न भागांतुन वन्य प्राण्यांकडुन येजा करण्यासाठी वापरला जाणारा भुभाग, नदी, ओढा अशा स्वरुपांचा मार्ग.
6) वैशिष्ठ्यपुर्ण पर्यावरण व्यवस्था:
जिवसृष्टीच्या दृष्टीने वैशिष्ठ्यपुर्ण पर्यावरण व्यवस्था म्हणजे असे क्षेत्र की ज्याला हानी पोचवण्यामुळे एखाद्या जिवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. (जसे की मॅन्ग्रोव्जची झुडपे असलेला भाग)
7) विशेष प्रजनन क्षेत्र:
एखाद्या क्षेत्रात जिवचर केवळ प्रजननासाठी येतात असा भाग. एरवी हे जिवचर येथे वास्तव्यास नसतात. परंतु गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरण असल्याने ते येथे येतात किंवा केवळ अंडी घालण्यासाठी येतात अशा स्वरुपाचे क्षेत्र
8) जुळवून घेण्याची क्षमता नसलेले (अ लवचिक) क्षेत्र: काही भुभागांची रचना नाजुक असते व अशा भुभागांची हानी सहज होते व भरुन निघणे अवघड असते. (सहज भुस्खलन होणे वगैरे)
9) पवित्र उपवन: ज्या वनभागाविषयी धार्मिक श्रद्धा जोडलेल्या आहेत असे क्षेत्र. अशा क्षेत्रात दुर्मिळ व औषधी जिवसृष्टी असण्याची शक्यता असते. त्या आधारावरच अशा क्षेत्राला धार्मिक श्रद्धा जोडली गेलेली असते. व अशा श्रद्धेपोटीच तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण होत असते.
10) घनदाट अरण्य: अशी जंगले जी खुपच घनदाट आहेत व जिथे मानवाचा हस्तक्षेप झाला नाही व ती जशीच्या तशी निसर्गाच्या चक्राप्रमाणे शाबुत आहेत. अर्थात मानवी संक्रमणांपासून दुर राहीलेली जंगले.
अशा कुठल्याही वर्गवारीमध्ये डहाणूचे कुठलेही क्षेत्र कधीही जाहिर झालेले नाही. फक्त डहाणूतील खाजणांत पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणारी सर्वत्र आढळणारी मॅन्ग्रोव्जची झुडपे (यावर स्वतंत्र भागात भाष्य करु या!)आढळतात. ही झुडपे देशभरात सर्वत्र आढळतात. व ती सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने हे क्षेत्र नो-डेव्हलोपमेंट झोनमध्येच मोडत असते. (क्रमश:)

जेपीजी फाईल साठी क्लिक करा!

Print Friendly, PDF & Email

comments