दिनांक 30 May 2020 वेळ 7:26 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जागतिक महिला दिनानिमित्त खरवंद येथे महिला मेळावा संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त खरवंद येथे महिला मेळावा संपन्न

IMG_20180308_112923जव्हार -तालुक्यातील उमेद अभियान अंतर्गत क्रांती महिला प्रभागसंघ व सिंधूताई महिला ग्रामसंघ खरवंद यांच्या वतीने आज ८मार्च २०१८रोजी महिला मेळावा चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद पालघर च्या माजी अध्यक्षा सुरेखा विठठ्ल थेतले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार व श्रीफळ वाहून कार्यक्रम सुरू केला यावेळी सुरेखा थेतले यांनी उपस्थित सर्व महिलांना महीला दिनाचे महत्व व महिला आरक्षण याविषयी मार्गदर्शन केले .त्यानंतर वन व वन्यजिव संवर्धन संस्था जव्हार चे अध्यक्ष गणेश बोराडे यानी व्रुक्ष लागवड व सर्प विषयी असलेल महिलामध्ये असलेली भीती व गैरसमज याविषयी महत्व पटवून दिले .तसेच उमेद अभियानातील धनंजय वायदंडे यांनी महिलांची पूर्वीची स्थिती व आजची स्थिती यामध्ये झालेला बद्दल याविषयी मार्गदर्शन केले .मनोज कामडी प्रभाग समन्वयक यांनी महिलांसाठी असलेले कायदे व त्याची सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन केले .
                 दुपार सत्रात याच परिसरातील समाजसेविका विमलताई पटेकर यांनी महिलासाठी केलेले कार्य व त्याचे अनुभव कथन केले व या भागातील कविता सांगितल्या .तसेच अलका मेतकर जामसर ग्रामसंघ अध्यक्ष यांनी महिला दिन महत्व सांगितले .तसेच उपस्थित महिलांनी आपल्या कामाची ओळख व करीत असलेले कार्य याविषयी मनोगत व्यक्त केले .व तसेच आदिवासी पारंपारिक वाद्य साबळ व तारपा याच्या तालावर न्रुत्य सादर करून आनंद लुटला .याकार्यक्रम प्रसंगी निवृत्त पोलिस निरीक्षक गोविंद गावित यांनी विशेष सहकार्य केले .तसेच यावेळी गावातील देवराम चौधरी , जयराम चौधरी , लता चौधरी , सदाशिव राऊत , बाळकृष्णा चौधरी यतीन भोये व हेमलता राऊत , पूजा हिरकूडा ,यमुना वैजल ,  वनिता जाधव व सर्व महिला स्वयंसहायता गट व हीरडपाडा प्रभागातील क्रियाशील महिला उपस्थित होत्या .या कार्यक्रमासाठी सर्व  खरवंद गावातील महिला गटांनी व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले .

comments

About Rajtantra

Scroll To Top