दिनांक 25 March 2019 वेळ 4:44 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जागतिक महिला दिनानिमित्त डहाणूत महिला मेळावा संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त डहाणूत महिला मेळावा संपन्न

Sorry, there are no polls available at the moment.

RAJTANTRA MEDIA/शिरीष कोकीळ :
MAHILA DIN DAHANU1डहाणू, दि. 08 : डहाणू पंचायत समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना व शिक्षण विभाग यांच्यावतीने आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. रश्मी प्रशांत सोनी, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती रामदादा ठाकरे उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अमिता पाटील, गट शिक्षण अधिकारी विष्णु रावते, बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. पी. गोखले आदी उपस्थित होते.
महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी आपल्या कामाने सेवेत विशेष ठसा उमटविणाऱ्या शिक्षिका हंसा विजयकांत पांचाल (चारोटी), नयन भरत राऊत (भीनारी), स्मिता सोहोनी (मल्याण), तसेच बाल अंगणवाडी सेविका द्वारका महादेव वाघमारे, रजनी भिलाजी ठाकरे, निकिता आशिष राऊत, अश्विनी लक्ष्मण मोरे, शारदा आत्माराम बारी, सरस्वती लक्ष्मण काठी यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात रत्नमाला गायकवाड यांनी महिला बालकल्याण योजनांची माहिती दिली. तर आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन व आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. संभाजी पवार यांनी महिलासाठींचे हक्क व संरक्षण विषयक कायदे याची माहिती दिली. कार्यक्रमाला शिक्षिका, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविक मनीषा हतकर आणि सूत्रसंचालन सुनीता शिंदाणे यांनी केले. गट विकास अधिकारी बी. एच. भरक्षे यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी स्वाती कलाल व शिक्षक प्रतिनिधी स्मिता सोहोनी यांनी विशेष भूमिका निभावली.

comments

About Rajtantra

Scroll To Top