दिनांक 11 December 2018 वेळ 1:21 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आदिवासी आश्रमशाळेचा अधिक्षक निलंबीत

विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आदिवासी आश्रमशाळेचा अधिक्षक निलंबीत

LOGO 4 Onlineदि. ५: डहाणू तालुक्यातील धामणगाव आश्रमशाळेतील १० वीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला अधिक्षक सूर्यकांत रघुनाथ बागल याला निलंबीत करण्यात आले आहे.
       एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या धामणगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना होळी निमित्त सुट्टी देण्यात आली होती. १० वी ची परिक्षा चालू असल्याने हे विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. २ मार्च रोजी शाळेचा अधिक्षक सूर्यकांत रघुनाथ बागल याने १० वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माहिती मिळताच लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि या उद्रेकातून बागलला चोप देखील देण्यात आला.
घटना घडली त्याच दिवशी पिडीत मुलीने तलासरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविल्यानंतर बागलला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांनी त्याला अटक देखील केली. ही घटना घडल्यानंतर जागे झालेल्या आदिवासी विकास विभागाने आता बागलाला निलंबित केले असून या शाळेमध्ये महिला अधिक्षक देखील नेमली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top