दिनांक 21 October 2018 वेळ 8:23 PM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » मोखाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहास मूलभूत सोयी-सुविधांसह कायम स्वरुपी इमारत मिळणार

मोखाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहास मूलभूत सोयी-सुविधांसह कायम स्वरुपी इमारत मिळणार

मुंबई, दि. 05 :LOGO 4 Online मोखाडा येथील जव्हार प्रकल्पांतर्गत असलेल्या मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहासाठी एक एकर जागा उपलब्ध झाली असून नविन इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन व इतर शैक्षणिक, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत दिली.
मोखाडा येथील मुलींच्या निवासी वसतिगृहाला कायम स्वरुपी इमारत व रिक्त पदे भरण्याबाबत तात्काळ कारवाई व्हावी यासाठी समर्थन या संस्थेने आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास विभागाचे सचिव व पालघर पोलीस अधिक्षकांकडे पाठपुरवठा केला होता. तसेच विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, किरण पावसकर व इतर सदस्यांमार्फत विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना सवरा म्हणाले की, वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली असून लवकरच त्याच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात मोखाडा येथील मुलींच्या वसतिगृहात एकूण 74 विद्यार्थीनींना प्रवेश दिला असून प्रवेशित विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन व इतर शैक्षणिक, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे वसतिगृहासाठी 6 पदे मंजूर असून त्यापैकी 4 पदे भरलेली आहेत. रिक्त असलेले कनिष्ठ लिपिक या पदाच्या भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच वसतिगृहात सध्या ठेका पद्धतीने दैनंदिन भोजन व्यवस्था असल्यामुळे मंजूर कामाठी पद आश्रमशाळेकडे वर्ग केले असल्याची माहिती सवरा यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top