दिनांक 25 March 2019 वेळ 4:38 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » मनोर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर

मनोर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर

प्रतिनिधी20180305_111916
मनोर, ता.05 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसीय मोफत वैद्यकीय व दंतचिकित्सा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या हस्ते आज या शिबीराचे उद्घाटन झाले.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना हर्निया, हायड्रोसील यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी मुंबईला जाणे शक्य होत नाही. अशा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज, दुपारपर्यंत सुमारे 700 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. अशाप्रकारे या महिन्याच्या 6, 7 व 8 तारखेला निदान झालेल्या रुग्णांवर पालघर व मनोर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 135 रुणांची नोंद करण्यात आली असुन सुमारे दिडशे रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. उमेश दुंपलवार यांनी सांगितले. तर शिबिरात तपासणीअंती शस्त्रक्रिया केलेला रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याचा आढावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा यंत्रणेमार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केली आहे.
यावेळी शिबिरात उपलब्ध करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा आणि तपासण्या तसेच हर्निया, हायड्रोसील शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे तपासणी, गॅस्त्रोअँड्रॉलॉजि, बालशल्यचिकित्सा, दंतचिकित्सा याबद्दल माहिती देण्यात आली. आरोग्य सेवा आपल्या दारी आल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य उपसंचालिका डॉ. सुरेखा मेंढे यांनी केले आहे.
याप्रसंगी पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे, उपसभापती मेघन पाटील, जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी, नीता पाटील, पंचायत समिती सदस्य श्रध्दा घरत, पांडुरंग गोवारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित आणि परिसरातील ग्रामस्थ व रुग्ण उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top