डहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर

0
6

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल?

 • पक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला (70%, 169 Votes)
 • दिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला (26%, 64 Votes)
 • दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला (4%, 9 Votes)

Total Voters: 242

Loading ... Loading ...

RAJTANTRA MEDIA / संजीव जोशी
[highlight]डहाणू दि. १: भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद बहुमत असलेल्या भाजपशासित डहाणू नगरपरिषदेने ५० कोटी ५८ लक्ष ४९ हजार ५८७ रुपयांचा ३० हजार ४६६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प किरकोळ दुरुस्त्यांसह अवघ्या २५ मिनीटांत मंजूर केला आहे. नगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न २० कोटी २५ लक्ष ३० हजार २८७ रुपये दर्शविण्यात आले असून त्यातून २० कोटी २४ लक्ष ९९ हजार ८२१ रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.[/highlight]

Bharat2

अर्थसंकल्पावर नगराध्यक्ष भरत राजपूत यांची छाप पहायला मिळते. भ्रष्ट्राचारमुक्त कारभार करुन दाखवू आणि लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणारा विकास करुन दाखवू असा विश्वास नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी अर्थसंकल्पाविषयी दैनिक राजतंत्रशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी अर्थसंकल्पाविषयी बोलण्यास अनुकूलता दाखवली नाही. उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला यांनी याबाबत २ दिवसांनी बोलू असे सांगून टाळले तर आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी थोड्या वेळात फोन करतो असे सांगून कलटी मारली.

mihir348742687316014642.jpg

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळातील ८० कोटींचे बजेट भाजपच्या राज्यात पहिल्याच वर्षी अर्ध्यावर आले. यातून विकासाचा वेग कसा असेल हे लक्षात आल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी राजतंत्रकडे व्यक्त केली

मागील वर्षाच्या ८० कोटी ७१ लाख ६१ हजार ३७४ रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा अर्थसंकल्प ६२ टक्के इतकाच आहे. हा अर्थसंकल्प अवघ्या ३८ कोटी ११ लाख ९९ हजार ५८७ रुपयांचा तयार करण्यात आला होता. मात्र स्थायी समितीने केलेल्या शिफारशींनुसार शासनाकडून अपेक्षीत अनुदानात वाढ करुन अर्थसंकल्प १२ कोटी ४६ लक्ष ५० हजार रुपयांनी वाढवण्यात आला. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात १ एप्रिल २०१७ रोजी १४ कोटी ६३ लक्ष १५ हजार ९९२ इतकी घसघशीत शिल्लक ठेवण्यात आली होती. अर्थसंकल्पातील आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१७ अखेरीस १८ कोटी ५९ लक्ष १५ हजार ४९ रुपये बाकी राहिल्याचे दिसत असून भाजपच्या हाती भरलेली तिजोरी आलेली दिसते. ही रक्कम खर्च करुन ३१ मार्च २०१८ पर्यंत नगरपरिषदेकडे १७ लक्ष ७६ हजार ५६१ रुपये शिल्लक रहाणार आहेत.

connectit-16843216667435820055.jpg

बजेटची वैशिष्ट्ये:

 • आरोग्य सुविधेला कात्री: चालू वर्षीच्या आरोग्य सोयी या लेखाशिर्षाखाली केलेल्या ९ कोटी ६२ लक्ष २० हजार २०० रुपयांच्या तुलनेत येत्या आर्थिक वर्षात ५ कोटी ६८ लक्ष ६० हजार १०० इतकी जवळपास ३ कोटींनी कमी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी कचरा गोळा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या ३ चाकी सायकलींच्या जागी ५ टाटा मॅजीक मिनी टेम्पो घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • मालमत्ता करात वाढ अपेक्षीत: मालमत्ता करात वाढ न करता ६० लक्ष ४५ हजार ५३६ रुपयांचे उत्पन्न वाढेल असे गृहीत धरण्यात आले आहे. घरपट्टीवरील व्याजात मागील वर्षीच्या ४ लक्ष १४ हजारच्या तुलनेत १९ लक्ष १६ हजार वसूल होतील असा अंदाज मांडण्यात आला आहे.
 • पाणीपट्टीतून उत्पन्न वाढ: पाणीपट्टी न वाढवता त्यातून मिळणारे उत्पन्न १ कोटी १६ लक्ष ९ हजार वरुन १ कोटी ५२ लक्ष ८५ हजार मिळेल असा अंदाज मांडण्यात आला आहे.
 • दलीत वस्तीची तरतूद कमी केली: चालू वर्षाच्या दलीत वस्ती अनुदानाने करावयाच्या कामासाठी ७ कोटी ६३ लक्ष २३ हजार रुपयांवरुन २५ लाख रुपये इतकी कमी तरतूद दर्शवून विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. अर्थात चालू वर्षी या लेखाशिर्षाखाली अवघे २० लाख रुपयेच मिळाले आहेत हे वास्तव स्विकारण्यात आले आहे. shubham7540002061756870931.jpg
 • पर्यटनावर विशेष लक्ष: चालू वर्षाच्या पर्यटन विकासासाठी मिळालेल्या १ कोटी ८० लाख रुपयांतून विकसित झालेल्या आगर येथील बगीचाचा विकास पाहून येत्या वर्षी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याच बरोबर येत्या वर्षी नगरपरिषदेचा चिकू फेस्टिव्हल भरविण्याचा मानस असून त्यासाठी २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • नागरी आदिवासी योजनेतील हवा काढली: नागरी आदिवासी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार होत असल्याचे आरोप होतात. अर्थसंकल्पात यावर्षी ५ कोटींची तरतूद २ कोटींवर आणली आहे.
 • भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटीची तरतूद: भुयारी गटारांसाठी शासनाकडून ३ कोटी रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा आशावाद या लेखाशिर्षाखाली केलेल्या ३ कोटी रुपयांच्या तरतुदी वरुन निर्माण होतो.
 • स्मशानात लाकडे मोफत मिळणार: नगरपरिषदेकडून स्मशानभूमीत पुरवल्या जाणाऱ्या लाकडाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नगरपरिषद १५ लाख खर्च करत असताना विक्रीतून अवघे १ लाख रुपये मिळणे अपेक्षीत होते. या १ लाख रुपयांवर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • शहर हायटेक करण्यासाठी १९ लक्ष: शहरात वाय फाय सेवा देण्यासाठी १० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून जिओ फोनच्या जमान्यात ही सेवा कितपत व्यवहार्य ठरेल हा प्रश्न उपस्थित होत असला तरी शहर आणि नगरपरिषद कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ९ लाखांची तरतूद स्वागतार्ह ठरणारी आहे.
 • पथदीवे/विद्युत वस्तू खरेदी/देखभाल/दुरुस्ती वर नियंत्रण: या खर्चामध्ये जवळपास ३६ लक्ष ५० हजार रुपयांची काटकसर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुसंख्य नगरसेवक मौनी बाबा: नगरपरिषदेच्या बहुतेक नगरसेवकांना अजून सुर गवसलेला नसून अर्थसंकल्पाविषयी गांभिर्य नसल्याने बहुसंख्य सदस्यांनी मौनी बाबाची भूमिका बजावली. सभा सुरु होताना नगराध्यक्ष भरत राजपूत, उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला, आणि बांधकाम सभापती जगदीश राजपूत याव्यतिरिक्त १३ अन्य नगरसेवक वेळेत हजर होते. भाजपचे बाकीचे ३ सभापती राष्ट्रगीत संपल्यानंतर आले. आरोग्य सभापती निमित गोहिल यांनी सभेकडे पाठ फिरवली.
३ सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला: राष्ट्रवादीचे शमी पिरा यांनी सर्वप्रथम वेळेत अर्थसंकल्पाची प्रत न मिळाल्याबद्दल आक्षेप नोंदवला. या प्रश्नावर प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली. यानंतर पिरा यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे नगरसेवक प्रशिक्षणासाठी तरतूद ५ लाखाने वाढवून १० लक्ष रुपये करण्यात आली. राष्ट्रवादीचेच तन्मय बारी यांनी निविदा मंजूर करताना त्या कुठल्या लेखाशिर्षातील तरतुदीप्रमाणे केल्या जातात याबाबत माहिती उपलब्ध व्हावी अशी सूचना केली असता ती अध्यक्षांनी मान्य केली. भाजपच्या रश्मी सोनी यांनी वाचनालयासाठी केलेल्या १५ हजार रुपयांच्या तरतुदीमध्ये वाढ सुचवल्यानंतर २ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email

comments