दिनांक 25 March 2019 वेळ 4:45 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » नाशिकच्या इंडोकिड्स प्रि स्कूल कडून आदिवासी भागात वस्तू वाटप

नाशिकच्या इंडोकिड्स प्रि स्कूल कडून आदिवासी भागात वस्तू वाटप


राजतंत्र मिडीया
जव्हार, दि. २७ फेब्रुवारी: बालपणापासूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी या उद्देशाने एक प्रकल्प म्हणून नाशिक येथील इंडोकिड्स या नामांकित पूर्व प्राथमिक शाळेतर्फे जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुलांकडून व त्यांच्या पालकांकडून जूने / नवे कपडे व वापरात नसलेल्या वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. जमा झालेले जुने कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करण्यात आले. मोठ्या संख्येने नवे कपडे देखील उपलब्ध झाले. त्याबरोबर खेळणी, चपला, स्वेटर्स असा मोठा खजिनाच जमा झाला. हे सर्व साहित्य जव्हार भागात काम करणाऱ्या डॉ. अनिता पाटील महाले, डॉ. गणेश अहेर यांच्या मार्फत परिसरातील गरजूंना वाटप करण्यात आले. होळी या आदिवासी बांधवांच्या महत्वाच्या सणाची चाहूल लागलेली असताना राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून देणारे, घेणारे आणि माध्यम बनणारे अशा सर्वांचे हात सुखावले. पवित्रा पगार यांनी या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली.

comments

About Rajtantra

Scroll To Top