दिनांक 20 January 2019 वेळ 8:33 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईला सुरूवात, १३ गांवांमध्ये टंचाईसदृष परिस्थिती मात्र पुरवठा विभागाची हरकत

मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईला सुरूवात, १३ गांवांमध्ये टंचाईसदृष परिस्थिती मात्र पुरवठा विभागाची हरकत

दीपक गायकवाड-मोखाडा-Mokhadaतालुक्यात दरवर्षी माहे जाने – फेब्रूवारी पासुनच पाणी टंचाईला सुरूवात होत असते.चालु वर्षी १३ गांवांमध्ये पाणी टंचाईला सुरूवात झालेली असून मौजे करोळ आणि वावळ्याचीवाडी येथे टिपवणं सदृष परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
मागील वर्षी पाणी टंचाई ग्रस्त गांवांची संख्या नव्वदीच्या घरात होती.या वर्षीही हा आकडा कायम रहाण्याचे चिन्हं आहेत.कारण हंगामी उपाययोजणे व्यतिरिक्त तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवांसाठी हुकमी उपाययोजणा केली जात नसल्याने वर्षानूवर्षे टंचाईग्रस्त आराखड्यावरील तीच ती गांवे आजही ठाण मांडून बसलेली आहेत.दरम्यानच्या अवधित पाणी टंचाई निर्मूलनासाठी केल्या गेलेल्या जलशिवार योजना , शिवकालीन पाणी साठवण योजणा , विहीरी , बुडके आदि उपाययोजणामुळे भरीवपणे पाणीटंचाई दुर होण्याऐवजी मोजक्या लोकांची नाणेटंचाई दुर झालेली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेकडोच्या घरातील गांवपाडे आजही पाण्यासाठी व्याकुळ आहेत.
तालुक्यातील करोळ , वावळ्याचीवाडी,बिवलपाडा,तुंगारवाडी,आसे,शास्रीनगर,स्वामीनगर,कुंडाचापाडा,गोळीचापाडा,धामोडी,दापटी क्र एक व दोन , धामणी या तेरा गांवांमध्ये टंचाई सदृष्य परिस्थिती असल्याने पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे.याबाबत मोखाडा पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता गोळीचापाडा , दापटी क्र एक व दोन , स्वामीनगर , बोहाडी आणि धामोडी येथेच पाणी टंचाईला सुरूवात होणार असल्याचे तसेच पाणी पुरवठा सुरू करावा लागणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगीतले आहे.तर उर्वरीत ठिकाणी पाणी टंचाई असल्याबाबत पुरवठा विभागाने नकारघंटा वाजविली आहे.

वाकडपाडा व किनिस्त्याची पाणी टंचाई मिटणार ?
मौजे वाकडपाडा येथे ₹ ५० लाख रूपयांची मोठी नळपाणी पुरवठा योजनेचे काम पुर्णपथावर असून येत्या १ मार्च रोजी प्रत्यक्ष वाकडपाडा ग्रामस्थांची तहाण भागविण्यांसाठी प्रस्तूत योजणा कार्यान्वीत होणार इसल्याचे शाखा अभियंता सुरेश खाद्री यांनी सांगीतले आहे.वाकडपाडा नळयोजनेसाठी मारूतीचीवाडी येथील बंधा-यातून पाणी उचलण्यांत येणार आहे.याप्रमाणेच मौजे किनिस्ते गांवासाठीही राष्ट्रीय पेय्यजल योजने अंतर्गत मध्यवैतरणा प्रकल्पावरून कोचाळा मार्गे नळयोजणा प्रकल्प राबविण्यांत
येणार असून प्रस्तूत योजनेचे  काम अंदाजपत्रक पातळीपर्यंत असल्याचे खाद्री यांनी सांगीतले आहे.
मारूतीचीवाडी बंधा-यातुन परिसरातील १२ गांवपाड्यांची तहाण भागविने शक्य होणार आहे.याबाबत खाद्री यांना छेडले असता प्रस्तूत गांवांचे नळयोजणा मागणीचे प्रस्ताव सादर होणार होते.परंतू अद्याप पर्यंत कुठलेही मागणी प्रस्ताव उपलब्ध झालेले नाहीत.तरी सुध्दा आम्ही मंजूरी आराखड्यात काही गांवांची नांवे समाविष्ठ केलेली आहेत.अशी माहिती खाद्री यांनी दिलेली आहे.

ग्रामसभेने ठाम भुमीका घेण्याची गरज
गांवांचा विकास साधण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेला ठोस अधिकार दिलेले आहेत.परंतू बहूतांश सदस्यांना त्यातील अधिकाराची कल्पना नसल्याने गांवांचा विकास कोसो दुर आहे.संबंधीत ग्रामसेवकांनी गांवांच्या जैवीक समस्यांची जाणिव ठेवून पाणी टंचाई सारखे विषय आणि त्यावरील उपाययोजणा ग्रामसभेपुढे चर्चेत घेतल्यास गांवाचा विकास दुर नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top