दिनांक 23 February 2019 वेळ 8:42 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ » खासदार चिंतामण वणगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासदार चिंतामण वणगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VANAG ANTYASANKARपालघर, दि. 31 : पालघर लोकसभेचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांच्या पार्थिवावर आज मुळगावी कवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वणगा यांचे काल, मंगळवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. वणगा यांच्या निधनाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा, आदिवासींचा कैवारी, अभ्यासु खासदार, ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, गुजरातचे आदिवासी विकास राज्यमंत्री रमण पाटकर, सिल्व्हासाचे खासदार नटुभाई पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार कपील पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, गणेश नाईक, आमदार हितेंद्र ठाकूर आनंदभाई ठाकूर, अमित घोडा, पास्कल धनारे, विलास तरे, मनिषा चौधरी, रविंद्र फाटक, संजय केळकर, माजी खासदार सिताराम गवळी, बळीराम जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिंलिंद बोरीकर, पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांसह जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्थानिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, खा. वणगा यांचे निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावून जाणारे आहे. अथक संघर्ष करून त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. दुर्गम भागात राष्ट्रीय विचार पेरण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. वंचित, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे हाती घेतलेले काम समाजोपयोगी असेल तर त्यासाठी सदैव संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. पदाचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही. सोपविलेली पदे व जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी कधीही भरुन न येणारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री सवरा म्हणाले, वणगा साहेबांच्या व माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात एकत्र सुरु झाली. खांद्याला खांदा लावून आम्ही अनेक वर्ष संघर्ष करत इथपर्यंत पोहचलो. मात्र आमची साथ अर्थवट सोडून आमचा साथीदार गेल्याचे आम्हाला अतीव दुःख आहे. पक्षाची भरून न येणारी हानी झाली असून पालघर जिल्ह्याची जनता पोरकी झाली आहे. ग्रामीण-दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्‍नांसाठी सदैव जागरूक असणारा लोकप्रतिनिधि आपण गमावला असून आपल्यावर असणारे भावाचं छत्र हरपले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजकारणाच्याही पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणार्‍या नेत्यांपैकी ते एक होते. अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वानीच घेण्यासारखा आहे, अशा शब्दात खा. वणगांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी गुजरातचे आदिवासी विकास मंत्री रमण पाटकर, खा. कपिल पाटील आ. मनीषा चौधरी, आ. संजय केळकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या कवाडा येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. हजारो पालघर वासियांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.जिल्ह्यात ठिकठिकाणी
बाजारपेठा बंद ठेवून वणगांना श्रध्दांजली

प्रतिनिधी
डहाणू, तलासरी, विक्रमगड, दि. 31 : पालघर लोकसभेचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगांच्या अकस्मित निधनाने सर्वत्र शोककळा पसरली. त्यांच्या मुळ गावी कवाडा येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार वनगांच्या निधनाची वार्ता समजल्यावर बुधवारी (दि. 31) जिल्ह्यातील डहाणू, तलासरी व विक्रमगडमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
वनगांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात डहाणू, तलासरी व जव्हारसारख्या आदिवासी भागातून केली. येथील जनतेच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने लढा दिला. पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून ते 1996 ला पहिल्यांदा विजयी झाले होते. 2004 पर्यंत त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तर 2014 मध्ये ते पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.
वनगांनी लोकसभा सदस्याबरोबरच 2009 ते 2014 या कालावधीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेशी त्यांची चांगलीच नाळ जुळली होती. जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात भारतीय जनता पक्ष उभा करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. या भागात झालेल्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग असे. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर त्यांनी विधानसभा व लोकसभेत अवाज उठविला. दांडगा लोकसंपर्क असलेला हा नेता अकस्मात गेल्याने येथील व्यापारीवर्गाबरोबरच सर्वसामान्य जनतेत शोकभावना होती. आज डहाणू, तलासरी व विक्रमगडमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून वणगांना श्रध्दांजली वाहिली.
{dH«$‘JS>‘Ü`o ~mOmanoR> ~§X R>odyZ dUJm§Zm lÜXm§Obr

comments

About Rajtantra

Scroll To Top