दिनांक 23 February 2019 वेळ 8:42 PM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » दांडेकर महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

दांडेकर महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान

DANDEKAR NEWSपालघर, दि. 28 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयास 2016-17 सालचा मुंबई विद्यापीठाचा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (ग्रामीण विभाग) दि. 26 जानेवारी 2018 रोजी मुंबई विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने पालघर ग्रामीण भागात केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाचा गौरव केला आहे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी व प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर, विश्वस्त आर. एम. पाटील व प्रा. तानाजी पोळ उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी आनंद व्यक्त करून संस्थेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याहस्ते सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी, प्रा. अशोक ठाकूर, प्राचार्य डॉ. किरण सावे, विश्वस्त आर. एम. पाटील व प्रा. तानाजी पोळ

comments

About Rajtantra

Scroll To Top