दिनांक 23 February 2018 वेळ 12:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नरेश वाडी येथील विद्यार्थ्यांनी पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

नरेश वाडी येथील विद्यार्थ्यांनी पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

NARESHWADI GOLD MEDALडहाणू दि. 21 : घोगरा, नेपाळ येथे 14 व 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत भारतीय मुले व मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात नेपाळ संघाचा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, थायलंड, श्रीलंका आणि सिंगापूर या देशांचे संघ सहभागी झाले होते. नरेश वाडी येथील सोमय्या शिक्षण संस्थेच्या अभिषेक नायर आणि सोनिया ठाकूर यांनी अनुक्रमे भारतीय मुले व मुलींच्या संघाचे नेतृत्व केले.
संस्थेच्या अभिषेक नायर, विश्वनाथ घाटाल आणि सोनिया ठाकूर, बना नडगे, मनिषा चौरे, सुरेखा महाला, वर्षा दौडा यांचा अनुक्रमे मुले व मुलींच्या संघात समावेश होता. संस्थेच्या क्रिडा शिक्षिका संध्या अशोक गायकवाड यांनी सर्व खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी आवश्यक मानसिक व शारीरिक तयारी करून घेतली आणि खेळातील बारकावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या घवघवीत यशाबद्दल खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top