दिनांक 23 February 2018 वेळ 12:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू बोट अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना शिवसेना जिल्हा प्रमुखांचा मदतीचा हात

डहाणू बोट अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना शिवसेना जिल्हा प्रमुखांचा मदतीचा हात

DAHANU ACCIDENT SHIVSENA MADATडहाणू दि. 21 : 13 जानेवारी रोजी डहाणू येथे समुद्रात बोट बुडून झालेल्या अपघातात बळी पडलेल्या जान्हवी सुरती, सोनाली सुरती आणि संस्कृती माह्यावंशी या विद्यार्थीनींच्या कुटूंबीयांना शिवसेनेचे नवे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी मदतीचा हात दिला आहे. शहा यांनी या कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच प्रत्येक कुटूंबीयांना 10 हजार रुपयांची मदत केली. यावेळी आमदार अमित घोडा, शिवसेनेचे डहाणू तालुका प्रमुख संतोष वझे, पालघर तालुका प्रमुख सुधीर तामोरे, संतोष शेट्टी, नागिन देवा यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते. राजेश शहा यांनी जिल्हा प्रमुख पदाची सूत्रे स्विकारून अवघ्या काही दिवसांचा कालावधी लोटलेला असताना त्यांनी लगेचच शिवसेनेतील मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे या निमित्ताने दिसून आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top