दि. 21 : डहाणूतील सीबीएसई अभ्यासक्रमाची पहिली शाळा ठरलेल्या क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील 45 लोकांनी रक्तदान केले. रक्तदानासंबधी जनजागृती व्हावी व मुलांमध्ये सुरुवातीपासूनच तसे संस्कार व्हावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती शाळेचे संचालक मिहीर शहा यांनी दिली आहे.