दिनांक 23 February 2018 वेळ 12:25 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी राजेश शहा उत्तम पिंपळेंची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी राजेश शहा उत्तम पिंपळेंची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी

विशेष प्रतिनिधी
पालघर, दि. 18 : शिवसेRAJESH SHAHAना पक्ष नेतृत्वाने संघटनात्मक बदल करत जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांची पदावरून उचलबांगडी केली असून राजेश शहा यांच्या खांद्यावर पालघर जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील शिवसेनेअंतर्गत संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले होते. अखेर बुधवारी (दि. 17) शिवसेना प्रमुख  उध्दव ठाकरे यांनी पालघरच्या जिल्हाप्रमुखपदी शहा यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत येत्या काळात संघटनात्मक मोठे फेर बदल होण्याची चिन्हे आहेत.
शहा हे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामिण भागात सक्रिय झाले होते.  नगरपंचायत निवडणुकी दरम्यान त्यांची सक्रियता अधिक उठून दिसली होती. तर नुकत्याच झालेल्या वाडा नगरपंचायत व जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकीची सूत्रेही त्यांच्याकडेच होती. यावेळी संपूर्ण निवडणूक काळात ते वाडा व जव्हारमध्ये ठाण मांडून होते. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाप्रमुख पिंपळे हे निवडणुकी दरम्यान धड फिरकले देखील नाहीत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर संघटनात्मक विस्तार करण्याचे शिवसेनेचे धोरण असून त्यामुळेच पालघर जिल्हा शिवसेनेत बदल झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शहा यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते पालघर येथे त्यांच्या कार्यालयात अभिनंदनाकरिता जमले होते.

जिल्ह्यात शिवसेनेच्या  संघटनात्मक  बांधणीवर भर देणार असून शिवसैनिकांचे मनोबल वाढवून जिल्ह्यात शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून पक्षनेतृत्वाने आपल्यावर विश्वास दाखवून जबाबदारी सोपविली आहे, तो विश्वास सार्थ ठरवू.

राजेश शहा, जिल्हाप्रमुख शिवसेना

comments

About Rajtantra

Scroll To Top