दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याहस्ते कब्बडी महासंग्रामाचे उद्घाटन

माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याहस्ते कब्बडी महासंग्रामाचे उद्घाटन

KABBADIवार्ताहर
बोईसर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशन व पालघर जिल्हा कब्बडी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर कला, क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पालघर जिल्हा कब्बडी लीग 2018 या कब्बडी महासंग्रामाचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. हे सामने प्रकाशझोतात आणि मॅटवर खेळवले जाणार आहेत.
या प्रसंगी डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मधुकर पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय न्यातीहितावर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष मार्तंड पाटील, पालघर पंचायत समितीच्या माजी उप सभापती सोनाली गवळी, नावझे येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत पाटील, गोवाडे येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील, नेटळी येथील डी. जी. पाटील, चहाडे येथील अजय पाटील, धुकटणचे चेतन पाटील, पालघर येथील प्रफुल्ल वैती, उद्योजक नितीन अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या महासंग्रामात भाग घेतलेल्या आठ संघांमध्ये लीग पद्धतीने 14 जानेवारीपर्यंत 16 समाने खेळले जाणार आहेत. प्रकाश झोतात व मॅटवर हे कब्बडी सामने खेळवले जात असल्याने पहिल्या दिवसापासुनच रसिकांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top