दिनांक 21 January 2018 वेळ 4:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुडूस : महारक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

कुडूस : महारक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

hप्रतिनिधी :

कुडूस, दि. 12 : कुडूस येथील पष्टे कॉम्प्लेक्स प्रांगणात जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास युवकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, ठाणे व पालघर जिल्ह्यात 16 ठिकाणी एकाच वेळी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कुडूस ग्रामपंचायतीच्या सरपंच छबीताई तुंबडे व माजी उपसरपंच ईरफानभाई सुसे यांच्या हस्ते कुडूस येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन, रामदास जाधव, गिरीश चौधरी, दामोदर डोंगरे व अनंता पाटील आदी उपस्थित होते. रक्तदान हे जीवनदान आहे. तरूणांनी या शिबीराला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी व आयोजक त्यांना धन्यवाद देतो. जिजाऊ जयंतीदिनी युवा दिन रक्तदान शिबिर घेऊन खर्‍या अर्थाने जयंती साजरी करून जिजाऊ सामाजिक संस्था व गिरीश चौधरी प्रतिष्ठान यांनी राष्ट्रीय कार्याला मोठा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन मुस्तफा मेमन यांनी याप्रसंगी केले.
ठाण्यातील ब्लडलाईन चॅरिटेबल ब्लड बँक या संस्थेने रक्तदान शिबिन रक्त संकलनाचे काम केले. या शिबीरातून 150 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्वांना फळे, पाणी, नास्ता आदी सुविधा गिरीश चौधरी यांनी केली होती.

comments

About Rajtantra

Scroll To Top