दिनांक 21 January 2018 वेळ 4:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सोनाळे गाव करणार हगणदारी मुक्त मुकूल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सोनाळे गाव करणार हगणदारी मुक्त मुकूल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

SONALE HAGANDARIMUKTप्रतिनिधी :

कुडूस, दि. 12 : वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सोनाळे या गावातील प्रत्येक कुटूंबासाठी एक शौचालय बांधून देण्याचा संकल्प मुकुल माधव फाऊंडेशनने केला आहे. या उपक्रमांतर्गत बांधून पूर्ण झालेल्या शौचालयांच्या लोकार्पण कार्यक्रमातुन फाऊंडेशनच्या व्यवस्थापिका रितू छाब्रिया यांनी ही माहिती दिली.

पुणे येथील फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने अतिदुर्गम अशा सोनाळे गावात घर तेथे शौचालय बांधण्याचा संकल्प केला आहे. यातील पहिल्या 50 शौचालयांचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सोन्या पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रशासकीय अधिकारी संदिप जाधव, खोसे, सरपंच अरूणा गरूडे, उपसरपंच पंढरीनाथ मराड, फिनोलेक्सचे बी. आर. मेहता, मुकुल फाऊंडेशनचे जितेंद्र जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. हगणदारी मुक्ती बरोबरच फाऊंडेशनने गावात ग्रामस्थांच्या सोयीसाठी सौर ऊर्जा दिवे लावले देखील आहेत. सोनाळे गावासह अन्य शौचालय नसणार्‍या गावातून उघड्यावर शौचास जाण्यामुळे टायफाईड, कॉलरा, पोलीओ, थंडीताप असे साथीचे आजार पसरतात. याची दखल घेऊन फाऊंडेशनने अशी गावे हगणदारी मुक्त करण्यासाठी हा संकल्प केला आहे.
सोनाळे गावात 123 घरे असून प्रत्येक कुटूंबाकडून शौचालय व सौरदिव्या पोटी काही नाममात्र रक्कम घेण्यात आली आहे. यातून जमलेली 1 लाख 2 हजार 500 रूपये एवढी रक्कम शहिद सैनिकांच्या पत्नीसाठी कार्य करणार्‍या संस्थेला देण्यात आली आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या विश्वस्थांनी दिली. या प्रेरणादायी उपक्रमाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी फाऊंडेशनच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top