दिनांक 21 January 2018 वेळ 4:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी ऊर्मिला पाटील यांची बिनविरोध निवड

वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी ऊर्मिला पाटील यांची बिनविरोध निवड

WADA UPNAGRADHYAKSHविशेष प्रतिनिधी
वाडा : दि. 11 : वाडा नगरपंचायतीत पनगराध्यक्षपदासाठी गुरूवारी (दि. 11) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उर्मिला पाटील बिनविरोध विजयी झाल्या.
वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 13 डिसेंबरला झाली होती. या निवडणुकीत प्रथमच नगराध्यक्षपदाकरिता थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय झाला होता. निवडणूकीत शिवसेना व भाजप यांच्यात खर्‍याअर्थाने लढत होऊन भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निशा सवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर या विजयी झाल्या. मात्र शिवसेनेला नगराध्यक्षपदात विजय मिळाला असला तरी नगरसेवक पदाच्या सतरा जागांपैकी अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसल्याने उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्याचे शिवसेनेपुढे आव्हान होते. नगरपंचायत निवडणूकीच्या निकालात शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बहुजन विकास आघाडी यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले होते.
आज झालेल्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाकरिता शिवसेनेकडून ऊर्मिला पाटील यांनी तर भाजपकडून गटनेते मनिष देहेरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र देहेरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उर्मिला पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूकीच्या पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांनी केली.
शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसल्याने शिवसेनेने काँग्रेसच्या दोन सदस्यांचा पाठिंबा सुरवातीलाच मिळवल्याने शिवसेनेचे संख्याबळ नगराध्यक्षांसह 9 झाले होते. समसमान मते पडल्यास नगराध्यक्षांना कास्टिंग मत देण्याचा अधिकार असल्याने शिवसेना आपला उपनगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणेल एवढे संख्याबळ झाल्याने अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बहुजन विकास आघाडी या पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा देत सत्तेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
यावेळी शिवसेनेचे नेते राजेश शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख अरूण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव मनीष गणोरे, तालुका प्रमुख प्रकाश पाटील, ज्येष्ठनेते प्रा. धनंजय पष्टे, तुषार यादव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहीदास पाटील, शहराध्यक्ष अमिन सेंदू आदी उपस्थित होते.

स्विकृत नगरसेवकपदी संदीप पवार, प्रकाश केणे यांची नियुक्ती
आज झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीदरम्यान स्विकृत नगरसेवकपदांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. नगरपंचायतीच्या एकूण संख्याबळानुसार दोन स्विकृत नगरसेवकांच्या जागा होत्या. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार भाजप व शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली होती. त्यानुसार भाजपकडून संदीप पवार व शिवसेनेकडून प्रकाश केणे यांची नावे सुचित करण्यात आली होती. त्यामुळे पवार व केणे यांची स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती केल्याची घोषणा पिठासीन अधिकारी गितांजली कोलेकर यांनी केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top