दिनांक 21 January 2018 वेळ 4:22 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पोलीस अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न! तरूणावर अंबाडी येथील रूग्णालयात उपचार सुरू

पोलीस अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न! तरूणावर अंबाडी येथील रूग्णालयात उपचार सुरू

WADA SUICIDE1विशेष प्रतिनिधी
वाडा : दि. 11 : तालुक्यातील चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिकार्‍याच्या जाचाला कंटाळून बुधवारी (दि.10) सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरूणाने सुसाईट नोट (आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी) सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कृपाल दाजी पाटील (वय 28) असे या तरूणाचे नाव असून त्याने लिहिलेल्या सुसाईट नोटनुसार, वाडा तालुक्यातील चिंचघर येथील कृपाल पाटील हा तरूण आपल्या विधवा आईसह राहून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याचे गावानजीकच असलेल्या एका गावातील मुलीबरोबर प्रेमप्रकरण होते. असे असतानाच या मुलीचे आणखी एक दोन तरूणांशी प्रेमसंबंध असल्याचे कृपाल याला समजल्यावर त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने तिला एक दोन फटके सुद्धा मारले. त्यानंतर थोडे दिवस ती मुलगी व्यवस्थित वागली. मात्र त्यानंतर पुन्हा तेच प्रकार मुलीने सुरू केल्याने या दोघांत वाद झाला. या वादानंतर मुलीच्या घरच्यांनी कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणवारे यांना भेटून तोंडी तक्रार केली.
रणवारे यांना भेटल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी ते कृपालकडून 2 लाखांची मागणी करू लागले. व पैसे दिले नाहीत तर मुलीचे व त्याचे काढलेले फोटो व व्हिडिओ तुझ्याकडे आहेत, असा खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवू, असा दम रणवारेंनी कृपालला भरला. 22 डिसेंबर 2017 रोजी कूडूस येथील पोलीस चौकीत कृपाल याला बोलावून पोलिसांनी मारहाण करून धमकावले व दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत कृपाल याने सदर पोलीस अधिकार्‍याला दोन टप्प्यात एक लाख रुपये एका कार्यकर्त्यामार्फत दिले. त्यानंतरही पोलीस अधिकारी रणवारे वारंवार आणखी पैशांची मागणी करून धमकावू लागल्याचे सुसाईट नोटमध्ये कृपाल याने नमूद केले आहे. कृपालच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने आणखी पैसे द्यायचे कूठून असा प्रश्‍न त्याच्यासमोर उभा राहिला. अखेर या जाचाला कंटाळून कृपालने बुधवारी सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृपालने सुसाईट नोट लिहून ठेवून ती सोशल मीडियावर टाकून व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार अथवा गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र सुसाईट नोटची दखल घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी शाहूराज रणवारे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
दरम्यान या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक सिंगे यांच्या स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top