दिनांक 21 January 2018 वेळ 4:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » टी.डी.सी.सी. बँकेच्या नोकर भरतीत घोटाळ्याचा आरोप चौकशी करण्याची निलेश सांबरेंची मागणी

टी.डी.सी.सी. बँकेच्या नोकर भरतीत घोटाळ्याचा आरोप चौकशी करण्याची निलेश सांबरेंची मागणी

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी
विक्रमगड, दि. 11 : नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती परीक्षेत पारदर्शक नोकर भरतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून परीक्षा घेतली गेल्याचा आरोप करत या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था झडपोलीचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांचे परिक्षा यादीत नाव नसल्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेला मुकावे लागले. तर काही उमेदवारांनी अर्ज भरलाच नसताना त्यांचे हॉल तिकीट आले. असा सावळा गोंधळ घडला असतानाच परीक्षा केंद्रावर आधीच उघडलेल्या लिफाफ्यातून उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या व उत्तरपत्रिकेची कोणतीच कार्बन कॉपी उमेदवारांना देण्यात आली नसल्याचा आरोप सांबरे यांनी केला आहे. या कथीत भ्रष्टाचारातून येथील लोकप्रतिनिधींना आपला हिस्सा मिळाला असल्याने ते याप्रकरणी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही सांबरे यांनी केला आहे. तसेच ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर अजूनही याप्रश्‍नी लक्ष का देत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कोकण विकास मंचच्या माध्यमातून आम्ही सातत्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकवर मोर्चे व उपोषणे करुन या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे. मात्र प्रत्येकवेळी जिल्हाधिकार्‍यांकडून आश्वासनां व्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अन्याय झालेला उमेदवार रस्त्यावर उतरण्याआधी याप्रकरणाची चौकशी करावी असा इशारा वजा मागणी सांबरे यांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top