दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

पालघर : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

JILHA PARISHAD KARYASHALAपालघर, दि. 11 : नियुक्ती ते निवृत्तीपर्यंत सर्व प्रशासकीय नियमांची माहिती सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला अवगत असणे आवश्यक आहे व त्या नियमांचे सचोटी व कर्तव्यानिशी पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी केले आहे. पालघर जिल्हा परिषद, यशदा पुणे व राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत देवऋषी बोलत होते.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी विभागीय चौकशी प्रकरणे, शिस्त व अपिल यासह जिल्हा परिषद कायदा, पंचायत समिती कायदा, ई-टेंडरिंग आदी 6 महत्वपूर्ण विषयांवर पालघर पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवसिय या कार्यशाळेत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असुन या विविध विषयांचे प्रशिक्षण 1 फेब्रुवारी पर्यंत टप्याटप्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) राजेंद्र पाटील, सहायक गट विकास अधिकारी बी. आर. कोळी यांसह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेत जिल्हाभरातून वरिष्ठ सहायक आणि कनिष्ठ सहायक सहभागी झाले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top