दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » गुरू शिष्य परंपरा जोपासणारा बंध मैत्रीचे माजी विद्यार्थी संघ

गुरू शिष्य परंपरा जोपासणारा बंध मैत्रीचे माजी विद्यार्थी संघ

प्रतिनिBANDH MAITRICHEधी :
कुडूस, दि. 11 : चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा संघ (ग्रुप) 27 वर्षानंतर प्रथमच एकत्र आला व त्यांनी आपल्या शाळेला संगणकांची भेट देऊन वृणानुबंध व्यक्त केले. ही परंपरा जोपासणार्‍या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
25 वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर काका काकी झालेले माजी विद्यार्थी एकत्र येतात, आपला दुरावलेला परिचय जवळ येऊन करून घेतात. या स्नेहपूर्ण नात्याने एकमेकांचे डोळे पाणावतात. अशा या भारदस्त वातारणाचा अनुभव चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयाच्या सन 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांनी अनुभवला. या प्रेरणादायी सोहळ्यातून वृणानुबंधाची ठेव म्हणून शाळेला चार संगणक भेट देवून शाळेशी अनोखा मैत्री बंध जोपासण्याची प्रेरणा आजच्या विद्यार्थ्यांना दिली.
या माजी विद्यार्थ्यांत काही डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, उद्योगपती झालेले आहेत. त्यांचे काम उत्कृष्ट आहे. सुजाता साळूंके, रत्नप्रभा चौधरी, डॉ. पुनम बागुल, जगदीश भोईर, सुधीर कडव यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच माजी शिक्षक व आताचे पालघर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी असलेले जे. के. पाटील, बी. एस. भोईर यांनी शालेय शिस्त, जिद्द व संघर्ष यांचे महत्त्व विषद केले. शाळेचे संचालक श्रीकांत भोईर यांनी या विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. व अशीच संघटन शक्ती ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमातून माजी शिक्षक पी. एन. पाटील, सावंत सर, पाचपांडे सर, व्ही. पी. भोईर, व्ही. सी. भोईर, चौधरी सर यांना भेटवस्तू देऊन वृणव्यक्त केले. प्रास्ताविक पोटकुले सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर कडव, अनंता दुबेले, संदीप पाटील, सतिश मराडे, समीर शेख यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top