दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूत दुकान फोडले 64 हजारांची रक्कम चोरीला

डहाणूत दुकान फोडले 64 हजारांची रक्कम चोरीला

cropped-LOGO-4-Online.jpgदि. 11 : डहाणू शहरातील इराणी रोडवरील प्रतीक कुंतावाला यांच्या बुट चप्पलच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातून 64 हजाराची रोख रक्कम चोरली आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांचे चेहरे कैद झाले असून पोलीस या फूटेजवरुन तपास करीत आहेत.
एक दिवस आधी घडलेल्या दुसर्‍या एका घटनेमध्ये स्टेशनरोडवरील अन्नपूर्णा पार्क या इमारतीमधील एका मेडीकल दुकानदाराच्या मोटरबाईकवरील पिशवीतून 50 हजार रुपये लंपास झाले आहेत. हा व्यापारी दुकान उघडत असताना चोरट्यांनी हात साफ केला. याप्रकरणी देखील पोलीस तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top