दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिजाऊ संस्थेकडून पालघर व ठाणे जिल्ह्यात आज 16 ठिकाणी महारक्तदान शिबीरे

जिजाऊ संस्थेकडून पालघर व ठाणे जिल्ह्यात आज 16 ठिकाणी महारक्तदान शिबीरे

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी
विक्रमगड : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोलीच्या विद्यमाने आज, 12 जानेवारी रोजी ठाणे व पालघर जिल्ह्यात तब्बल 16 ठिकाणी एकाच वेळी (सकाळी 9 ते दुपारी 4) महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले असल्याचे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील कुडूस, खानिवली, वाडा, झडपोली, मनोर, तलासरी, कासा, उधवा, जव्हार, व मोखाडा या ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, डोळखांब, किन्हवली, शहापूर, पडघा व अंबाडी अशा एकुण 16 ठिकाणी या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी या महारक्तदान शिबिरामध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तसेच सुजाण नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन या शिबिराचे प्रमुख संयोजक व जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top